Kiran Mane : अभिनेता किरण मानेची राजकारणात एन्ट्री, ‘या’ पक्षात करणार प्रवेश
अभिनेता किरण मानेने राजकारणात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मातोश्रीवर जाऊन किरण माने शिवबंधन बांधणार आहे.
ADVERTISEMENT

Kiran Mane Latest News : आपल्या रोखठोक राजकीय भूमिकांमुळे कायम चर्चेत राहणारा मराठी अभिनेता किरण माने राजकारणात पाऊल ठेवणार आहे. किरण मानेने राजकीय पदार्पण करण्यासाठी पक्षही निश्चित केला आहे. किरण माने शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश करणार आहे. उद्धव ठाकरे त्यांना शिवबंधन बांधणार असून, मातोश्रीवर हा पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे.
‘मुलगी झाली हो’, ‘बिग बॉस मराठी’ या मराठी शोसह ‘टकाटका’, ‘रावरंभा’, ‘स्वराज्य’ या चित्रपटात भूमिका साकारणारा मराठी अभिनेता किरण माने त्याच्या राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भूमिकांमुळे नेहमी चर्चेत असतो. तो आता राजकारणातच पाऊल ठेवणार आहे.
उद्धव ठाकरे बांधणार शिवबंधन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित किरण माने पक्षप्रवेश करणार आहे. आज (7 जानेवारी) मातोश्रीवर इतर पक्षातील नेत्यांच्याही ठाकरेंच्या सेनेत पक्षप्रवेश होणार आहे. त्यात किरण माने यांचाही समावेश आहे.
हेही वाचा >> पुर्ववैमनस्य अन् 20 वर्षीय मास्टरमाईंड, पुणे पोलिसांनी सांगितला हत्याकांडाचा थरार
बीड जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकारी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनसेचे घाटकोपर उपविभाग अध्यक्ष नीलेश जंगमही ठाकरेंच्या सेनेत प्रवेश करणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे इतर पदाधिकाऱ्यांसोबत अभिनेता किरण मानेच्या हाती शिवबंधन बांधून त्यांना पक्षात प्रवेश देणार आहेत.










