धक्कादायक… ट्रोलर्समुळे कुमार सानूच्या मुलीसोबत घडला भयंकर प्रकार
कुमार सानूची मुलगी शॅननने नुकताच एक मोठा खुलासा करून लोकांना हैराण केले आहे. शॅननने लहान वयात ऑनलाइन ट्रोलिंगला सामोरे जावे लागल्याबद्दल सांगितले.
ADVERTISEMENT
Kumar Sanu’s daughter Shannon : सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांची गायन विश्वातील कारकीर्द महान आहे. त्यांच्या सुरेख आवाजासाठी आजही लोक तितकेच वेडे आहेत. कुमार सानू यांच्या वैयक्तिक जीवनात अनेक गोष्टी घडल्या आहेत. नुकतेच कुमार सानूची मुलगी शॅननने एक मोठा खुलासा करून लोकांना हैराण केले आहे. शॅननने लहान वयात ऑनलाइन ट्रोलिंगला सामोरे जावे लागल्याबद्दल सांगितले. यासोबतच तिने डिप्रेशनमध्ये जाणे आणि स्वत:ला केलेला त्रास याबद्दलही सांगितले आहे. शॅननने सांगितले की, ‘लहान वयातच तिला वाईट पद्धतीने ट्रोल केले गेले होते. त्याचा त्तिच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता.’ (Kumar Sanu’s daughter Shannon reveals the bad incident happened to being trolled)
ADVERTISEMENT
ट्रोल्सच्या शब्दांचा शॅननवर इतका परिणाम झाला की ती स्वतःलाच इजा करायची. ती डिप्रेशनमध्ये गेली होती. तिच्या आयुष्यातील वाईट टप्प्याबद्दल बोलताना ती म्हणाली, ‘जेव्हा मी पहिल्यांदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला तेव्हा मी 14-15 वर्षांची होती. लोक माझ्या पोस्ट आणि फोटोंवर वाईट कमेंट्स करायचे. तेव्हा मी खूप लहान होती.’
नक्षलवाद्यांकडून प्रचंड मोठा हल्ला, IED स्फोटात 11 जवान शहीद
‘माझ्या आयुष्यातील ती सर्वात मोठी चूक’- शॅनन
शॅनन पुढे म्हणाली की, ‘त्यावेळी मला कल्पना नव्हती की मी किती मोठी चूक करत आहे. ट्रोल्स म्हणजे काय याची मला अजिबात कल्पना नव्हती. या गोष्टी मी खूप गांभीर्याने घ्यायची. ही माझी सर्वात मोठी चूक होती. या गोष्टींना मी माझ्या मनात इतकी जागा दिली की मी डिप्रेशनमध्ये गेली. मी स्वतःला इजा करू लागले. तो काळ खूप वाईट होता.’
हे वाचलं का?
बॉलिवूडमध्ये काम करण्याची शॅननला इच्छा
‘देवाच्या कृपेने, माझ्याकडे माझे कुटुंब आणि मित्र आहेत, ज्यांनी मला या वाईट काळातून बाहेर येण्यास मदत केली. माझ्यासाठी हा एक मोठा धडा होता. मी सर्वांना सांगू इच्छिते की कोणत्याही गोष्टीला अंत नाही. जेव्हा तुम्हाला वाटत असेल की सर्वकाही संपले आहे तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्टीमागे एक चांगली गोष्ट घडत असते. मी या टप्प्यातून गेली आहे, मी समजू शकते की ते कसे असते.’ असे शॅनन पुढे म्हणाली.
भावी मुख्यमंत्री ‘अजित पवार’ : महाराष्ट्रात लागलेल्या होर्डिंग्जचा नेमका अर्थ काय?
शॅनन सानूही गाते. यासोबतच तिने ‘द बिग फीड’ या हॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे. सध्या ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. शॅनन ही कुमार सानू यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे. कारण, सानू यांची दुसरी पत्नी सलोनीला पहिल्या लग्नापासून शॅनन आणि अॅना अशा दोन मुली आहेत. तर, कुमार सानू यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून तीन मुले आहेत. ज्यांची नावे जिको, जस्सी, जान अशी आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT