नक्षलवाद्यांकडून प्रचंड मोठा हल्ला, IED स्फोटात 11 जवान शहीद

मुंबई तक

ADVERTISEMENT

chhattisgarh dantewada naxalaite attack
chhattisgarh dantewada naxalaite attack
social share
google news

Naxalaite Attack : छत्तीसगडमध्ये जवानांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला (Naxalaite Attack)  केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेत 11 जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दंतेवाडा (Dantewada) जिल्ह्यात ही घटना घडलीय. या घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांची आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. (chhattisgarh dantewada naxalaite attack jawan martyred)

दंतेवाडाच्या (Dantewada) अरनपुरमधून डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड (DRG) फोर्सला घेऊन जाणाऱ्या वाहनावर (Naxalaite Attack) नक्षलवाद्यांनी IED या स्फोटकाने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत 11 जवान शहीद झाले आहेत. यामध्ये 10 डिआरजीचे जवान होते तर 1 ड्रायव्हर होता. या हल्यानंतर स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत नक्षलवाद्यांना (Naxalaite Attack) घेरल्याची माहिती आहे. आता पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.

जवान एका मोठ्या ऑपरेशनसाठी निघाले होते.यावेळी अरनपूरच्या पालनार भागातून जाणाऱ्या जवानांच्या गाडीला IED या स्फोटकाने उडवले होते. सध्या घटनास्थळी दोन अॅम्ब्यूलन्स पाठवण्यात आल्या आहेत. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा पॅटर्न अजूनही बदलला नाही आहे. जेव्हा भारतीय जवान त्यांच्या भागात आल्याचे कळताच, घात लावून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, अशी माहिती बस्तरचे आईजी सुंदरराज यांनी दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुख्यमंत्र्यांकडून ट्विट करून दु:ख व्यक्त

शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. हा लढा शेवटच्या टप्प्यात सुरु असून नक्षलवाद्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही. आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने नक्षलवाद संपवू ,असे ट्विट छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले आहे.

ADVERTISEMENT

आतापर्यंत नक्षली हल्ल्यात 489 जवान शहीद

छत्तीसगडचे 8 जिल्हे हे नक्षल प्रभावित आहे. यामध्ये बीजापूर, सुकमा, बस्तर, कांकेर,नारायणपूर, राजनंदगांव, कोंडगाव आणि दंतेवाडा यांचा समावेश येतो. आज जो हल्ला झाला होता, तो दंतेवाडामध्ये झाला. गेल्या 10 वर्षात म्हणजेच 2011 ते 2020 दरम्यान छत्तीसगडमध्ये 3 हजार 722 नक्षली हल्ले झाले होते. या हल्ल्यात 489 जवान शहीद झाले होते. गृह मंत्रालयाने एप्रिल 2021 रोजी लोकसभेत या संदर्भातली माहिती दिली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT