Uddhav Thackeray: भर पावसात ठाकरेंची सभा.. मोदींवर हल्लाबोल, भाषण जसंच्या तसं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

भर पावसात उद्धव ठाकरेंची सभा..
भर पावसात उद्धव ठाकरेंची सभा..
social share
google news

Uddhav Thackeray Rain Speech Video:परभणी: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या परभणीतील प्रचारसभेत पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, भर पावसात देखील शिवेसना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाषण करत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. (lok sabha election 2024 shiv sena ubt candidate sanjay bandu jadhav campaign rally in parbhani uddhav thackeray speech in the rain attacked on pm modi speech as it is)

उद्धव ठाकरेंचं भर पावसातील भाषण जसंच्या तसं... 

'मी वादळात उभा राहणार आहे.. तुम्ही राहणार आहात की नाही.. मी संकटाशी झुंज देणार आहे.. तुम्ही देणार आहात की नाही? अरे हा पाऊस आला तरी मी पावसात भिजणार आहे.. तुम्ही भिजणार आहात की नाही.. येऊ दे किती संकट यायचं तेवढं.. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील आम्ही मर्द मावळे आहोत.' 

'त्या संकटाला आम्ही चिरडून टाकलं तर हे संकट कोणतंय.. मी पहिल्या प्रथम तमाम सर्व परभणीकरांना अक्षरश: साष्टांग दंडवत घालतो. कारण परभणी हा.. माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.. तुम्ही सगळे त्याचे सैनिक आहेत..' 

'भाजपला असं वाटलं असेल, मिंध्यांना असं वाटलं असेल की, सगळं काही पैशाने खरेदी करता येतं.. पण परभणीकर पैशाने विकले जाऊ शकत नाही. हे शिवसेनाप्रमुखांनी जे प्रेम कमावलं आहे.. ते माझ्यासमोर बसलं आहे. आपली परीक्षा आहे..' 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'अरे वादळाला देखील अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते.. ती आपल्याकडे आहे. आम्ही पाठीवर वार करत नाही. आम्ही वादळाच्या देखील छातीवर वार करणारे शिवरायांचे मावळे आहोत.' 

'तुम्हाला कल्पना आहे की, दोन दिवसांपूर्वी मी पत्रकार परिषद घेतली होती. आपलं जे मशाल गीत आहे.. त्यात एक शब्द आहे 'जय भवानी, जय शिवाजी..' जरा एकदा जोरात द्या नारा..' 

ADVERTISEMENT

'आता त्या गाण्यातला हा मोदी-शाहांचा जो नोकर निवडणूक आयोग आहे त्याने सांगितलं की, जय भवानी शब्द काढा.. काढायचा का शब्द?'

ADVERTISEMENT

'अरे मी तर मोदी आणि शाहांना सांगतोय की, तुम्हाला कान धरून महाराष्ट्र जय भवानी, जय शिवाजी बोलत उठाबशा काढायला लावल्याशिवाय राहणार नाही.. तुमचा आकस महाराष्ट्राबद्दल.. ठीकए त्याचा फडशा आम्ही पाडू. तुम्हाला उद्धव ठाकरे संपवायचाय ना.. बघा प्रयत्न करून. हा उद्धव ठाकरे उभा आहे आणि त्याचे सगळे मर्द मावळे उभे आहेत.' 

'आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो, जय बजरंगबली बोलतो.. आज तर हनुमान जयंती आहे. पण जय भवानीबद्दल तुमच्या मनात द्वेष आणि आकस का आहे? यांना काय वाटतं? दिल्लीमध्ये बसून आपण म्हणून तसं देश त्यांचं ऐकेल? ही जिवंत माणसं आहेत.. गुर-ढोरं नाहीत..'

हे ही वाचा>> 'महाराष्ट्रात एवढ्या जागा मिळतील', पवारांनी आकडाच सांगितला

'अंगावर आलात.. प्रेमाने मिठी मारली तेव्हा साथ दिली होती. पण पाठीत वार केलात तेव्हा ही माझी वाघनखं बाहेर आली आहेत. हे मध्ये मुनगंटीवारांसारखी आम्ही शोबाजी नाही करत.. वाघनखं परत आणणार.. बसा स्वत:ची नखं कापत बसा..'

'तुम्हाला एक-एक विषय कळले पाहिजे.. हा महाराष्ट्र आहे.. छत्रपती शिवाजी महाराजांचा, साधूसंतांचा महाराष्ट्र आहे.. हा महाराष्ट्र महिलेचा अपमान कधी सहन करत नाही. पण याच सरकारच्या मुनगंटीवाराने त्यांना काय कोणत्या भाषेत बोलायचं ते कळत नाही. हा विकृत बुद्धीचा माणूस आहे.. बुद्धी भ्रष्ट मी म्हणत नाही.. कारण बुद्धीच नाहीए. उघड बोलतोय.. त्यांनी त्यांच्या प्रचाराच्या सभेत, मोदीजींच्या सभेत बहीण-भावाच्या नात्याबद्दल जे बोलले ते सुसंस्कृत माणसाला मान खाली घालायला लावणारं आहे.' 

'मोदीजी त्यांच्याबद्दल काही बोला ना.. तुमच्या अलीकडे पलीकडे जे बसले आहेत... ठीक आहे तुम्हाला कोणीतरी लिहून देतं..' 

'पण तुम्ही उद्धव ठाकरेंची शिवसेना.. म्हणजे ही सगळी बसलेली शिवसेना.. ही नकली शिवसेना बोलता आहात. मग तुमच्या आजूबाजूला जी टीनपाट बसली आहेत. ते वाट्टेल ते बोलतायेत. महिलांचा अपमान करतायेत..' 

'एक इथलेच ते मंत्री बसले मांडीला मांडी लावून यांच्या.. ते सुप्रिया सुळेला.. सुप्रियाताई म्हणतो.. मी तिला अरेतुरे म्हणतो.. तिला चॅनलसमोर शिवी दिली. पण मोदी-शाह काही बोलायला तयार नाहीत. महिलांचा अपमान केला तरी चालेल.. पण आम्हाला तुम्ही मतं द्या.. या अशा असंस्कृत माणसांना एकही मत मिळता कामा नये.'

'आज यांच्याकडे बोलायला मुद्दे नाहीत. आपल्या घराणेशाहीबद्दल बोलतात.. अरे मी आहेच ना.. मला माझ्या आई-वडिलांचा अभिमान आहे. मी शिवसेनाप्रमुख आणि माझ्या माँचा मी पुत्र आहे.. आज मोदींचं नाणं महाराष्ट्रात चालत नाही.. मोदींचा चेहरा महाराष्ट्रात चालत नाही.. म्हणून त्या गद्दारांना आपला हिंदूहृदयसम्राटांचा फोटो लावून मतं मागण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.' 

'आमची घराणेशाही पाहिजे की नाही ही आमची जनता ठरवेल.. पण मोदीजी तुम्ही जेव्हा आमच्या घराणेशाहीवर बोलता तेव्हा आम्ही तुमच्या एकाधिकारशाहीवर बोलतो आणि बोलणारच..' 

'संपूर्ण देशभरात या भाकड जनता पक्षाची एक नवी मालिका सुरू झाली आहे.. कोणती.. जुमला 3' 'बरोबर ना.. 2014 साली पहिल्यांदा आला जुमला 1, नंतर 2019 आलं जुमला 2.. आणि पुन्हा 2024 ला येतंय जुमला 3.. अॅक्टर तोच, खलनायक तोच.. स्टोरी रायटर तोच.. सगळे काही तेच.. आणि किती वेळा ती मालिका पाहायची.' 

'किती वेळा ती मालिका पाहायची.. पहिली दोन भागात आम्हाला वाटलं.. बरी असेल मालिका.. काही तरी महाराष्ट्राचं कल्याण होईल. पण 10 वर्ष यांनी पूर्ण महाराष्ट्र नासवून टाकला, देश नासवून टाकला.' 

'बरोबर आहे.. एकदा मोठ्याने बोला.. हा दादा काय बोलला ते ऐकलं का तुम्ही? अबकी बार भाजप तडीपार..' 

'ही मालिका आता बंद करा.. आपल्या डोळ्यादेखत आपला महाराष्ट्र लुटतायेत.. महाराष्ट्रातले उद्योगधंदे लुटतायेत.. महाराष्ट्राच्या हक्काचं आहे ते कुठे घेऊन जातायेत?'

हे ही वाचा>> "आमची परवानगी गेली चुलीत", शाहांची सभेवरून कडूंचा रौद्रवतार

'तरी आपण गप्प बसायचं? यांना पुन्हा मत द्यायचं? की बंडू सारखं.. संजय बोललो तर कोणी ओळखणार नाही.. बंडूच बोललं पाहिजे.. एक निष्ठावान कट्टर मावळा.. जो आपलं इमान त्याने विकलेलं नाही. तुमच्या परभणीकरांसाठी जो दिल्लीतही लढतोय त्याला किती मताधिक्याने निवडून देणार..' 

'मला मताधिक्य तर जास्त पाहिजेच.. पण समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून मला यावेळेला विजय हवाय. कारण ही निवडणूक केवळ शिवसेनेची नाही.. ही निवडणूक तुमच्या-आमच्यासाठी संपूर्ण देशासाठी लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे.' 

'तुमचं मत तुम्ही कोणाला देणार? लोकशाही की हुकूमशाहीला? आपला निर्धार पक्का आहे? परभणीत एक गोष्ट बदलली आहे.. फक्त आपली निशाणी बदलली आहे.. विजय होणार विशाल..' असं घणाघाती भाषण उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं आहे.. 

 

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT