कुर्रर्रर्रर्र – १०० नाही तर १००० टक्के मनोरंजन करणारं नाटक
मराठी रंगभूमी समृध्द का आहे? याच रंगभूमीवर अचाट असे वेगवेगळे प्रयोग कसे होऊ शकतात? मराठीतले रंगभूमीवरचे कलाकार इतके अफलातून कसे? असे एक ना अनेक प्रश्न मराठी सोडून जगातल्या इतर रंगभूमीच्या रंगकर्मींना,सामान्य प्रेक्षकांना नक्कीच पडतात. मात्र त्यावरचं उत्तर आहे की मराठी रंगभूमीवरचे कलाकार हे अस्सल हिरा आहेत हिरा.. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे.. कुर्रर्रर्रर्र हे मराठी […]
ADVERTISEMENT

मराठी रंगभूमी समृध्द का आहे? याच रंगभूमीवर अचाट असे वेगवेगळे प्रयोग कसे होऊ शकतात? मराठीतले रंगभूमीवरचे कलाकार इतके अफलातून कसे? असे एक ना अनेक प्रश्न मराठी सोडून जगातल्या इतर रंगभूमीच्या रंगकर्मींना,सामान्य प्रेक्षकांना नक्कीच पडतात. मात्र त्यावरचं उत्तर आहे की मराठी रंगभूमीवरचे कलाकार हे अस्सल हिरा आहेत हिरा.. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे.. कुर्रर्रर्रर्र हे मराठी रंगभूमीवर आलेलं नवीन नाटक. बालनाट्य,एकांकिका,स्कीट यातून तावून सुलाखून निघालेले ४ तगड़े विनोदवीर जर एकत्र आले तर काय धम्माल येईल याची प्रचिती म्हणजे कुर्रर्रर्र हे नाटक… पंढरीनाथ (पॅडी कांबळे), विशाखा सुभेदार,नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर हे नुसते विनोदवीर नाही तर एक परिपूर्ण कलाकार आहेत. आणि या चौघांचे हे नाटक म्हणजे रसिकांसाठी निखळ मनोरंजनाची अर्पूवाई आहे…
विशाखा सुभेदार या गुणी अभिनेत्रीने निर्मितीमध्ये आपलं पहिलं पाऊल टाकलं आहे. आणि त्यासाठी तिने नाटकाने सुरवात केली यासाठी तिचं भरभरून अभिनंदन,महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे घरांघरांत पोहचलेला गुणी लेखक, कलाकार प्रसाद खांडेकरच्या आयडियाच्या कल्पनेतून कुर्रर्रर्रर्रचा कागदावर जन्म झालाय. आणि या नाटकाचं दिग्दर्शनही त्यानेच केलं आहे.