Veer Savarkar : सावरकरांवरील बायोपिकमधून महेश मांजरेकरांची माघार, कारण…
स्वातंत्र्यसैनिक ‘विनायक दामोदर सावरकर’ यांचा बायोपिक बनवला जात होता. चित्रपटाचे नाव ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ होते . या चित्रपटात रणदीप हुडा सावरकरांची भूमिका साकारत होता. महेश मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते. मात्र आता हा चित्रपट एका मोठ्या गोंधळात सापडला आहे.
ADVERTISEMENT
Mahesh Manjrekar On Veer Savarkar biopic : स्वातंत्र्यसैनिक ‘विनायक दामोदर सावरकर’ यांचा बायोपिक बनवला जात होता. चित्रपटाचे नाव ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ होते . या चित्रपटात रणदीप हुडा सावरकरांची भूमिका साकारत होता. महेश मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते. मात्र आता हा चित्रपट एका मोठ्या गोंधळात सापडला आहे. महेश मांजरेकर चित्रपटातून बाहेर पडले की त्यांना काढलं यावर चर्चा सुरू आहे. (Mahesh Manjrekar left Veer Savarkar biopic Direction Cause of interference of Randeep Hooda)
ADVERTISEMENT
सावरकरांवरील चित्रपटाचे सर्व हक्क फक्त रणदीप हुडा फिल्म्सकडे असल्याचे रणदीप हुड्डा यांनी दावा केला आहे. तर चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित आणि संदीप सिंग, रणदीपचा हा दावा चुकीचा ठरवत आहेत. त्यांचं म्हणणं की, ‘रणदीपने कोणाच्याही परवानगीशिवाय चित्रपटातील शूट केलेल्या भागांचे फुटेज काढून घेतले आणि आता तो म्हणतोय की हा त्याचा चित्रपट आहे.’
Amol Kolhe: ‘सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?’, अमोल कोल्हेंनी लोकसभा दणाणून सोडली!
महेश मांजरेकरांना या प्रोजेक्टमधून काढलं? की ते स्वत:च बाहेर पडले?
या संपूर्ण वादावर महेश मांजरेकर यांनी नुकतच मौन सोडलं आहे. त्यांना 2022 मध्ये या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी साइन करण्यात आले. नंतर त्यांना या प्रोजेक्टमधून काढून टाकल्याचं म्हटलं जात आहे. यावर महेश म्हणले, ‘त्यांना चित्रपटातून काढले नाही. तर, रणदीप हुडाच्या हस्तक्षेपाला कंटाळून त्यांनी स्वतःच चित्रपट सोडला.’
हे वाचलं का?
महेश मांजरेकर पुढे म्हणाले, ‘मी गेली पाच वर्ष या विषयावर काम करत होतो. मी निर्माते आनंद पंडित आणि संदीप यांच्याशी संपर्क साधला. जेव्हा त्यांनी या प्रकल्पात पैसे गुंतवण्याची तयारी दर्शवली, तेव्हा ही भूमिका कोण करू शकते यावर चर्चा झाली. रणदीपचे नाव पुढे आले. आम्ही त्याची लुक टेस्ट केली. मला वाटले की तो या पात्रासाठी योग्य आहे. म्हणून आम्ही त्याला साइन केले. संपूर्ण स्क्रीनप्ले माझा आहे. मी चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर काय झाले ते मला माहित नाही. पण सुरुवातीपासून इंटरवल आणि शेवटपर्यंत, सर्व काही माझे आहे.’
PUNE: ‘मी माझ्या देहाचा त्याग करतोय..’ 9 विद्यार्थ्यांनी शाळा सोडताच शिक्षकाने वर्गातच…
रणदीप हुड्डाबद्दल मांजरेकर नेमकं काय म्हणाले?
महेश मांजरेकर यांनी सांगितले की, जेव्हा ते रणदीप हुड्डा यांना भेटले तेव्हा त्यांना वाटले की तो खूप प्रामाणिक अभिनेता आहे. चित्रपटांच्या विषयांशी बऱ्यापैकी गुंतलेला आहे. दोघांच्या काही भेटी झाल्या. यानंतर रणदीपने या चित्रपटात काम करण्यासाठी अनेक पुस्तकं वाचली. त्याला या गोष्ट खूप मनोरंजक वाटली.’
ADVERTISEMENT
‘चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट रणदीपला ऐकवण्यात आला. त्यात त्याला काही अडचणी होत्या पण नंतर त्या सोडवण्यात आल्या. त्याला दुसरा ड्राफ्ट ऐकवण्यात आला. यामध्येही त्यांने काही आक्षेप घेतले. महेश यांच्या म्हणण्यानुसार, यावेळी त्यांनी रणदीपला सांगितले की, अशा गोष्टी होत राहिल्या तर चित्रपट बनवण्यात अडचणी येतील.’ यावर रणदीप म्हणाला की, एकदा काही स्क्रिप्ट फायनल झाली की मग तो काही बोलणार नाही.
ADVERTISEMENT
महेश यांनी सांगितलं की, ‘रणदीपच्या अडचणी संपण्याचं काही नावच घेत नव्हत्या. त्यामुळेच दोघेही अॅम्बी व्हॅलीला गेले. तिथे बसून चर्चा केली. यानंतर त्यांना वाटले की स्क्रिप्ट फायनल झाली आहे. पण पुन्हा रणदीपला स्क्रिप्टसंबंधित समस्या होऊ लागल्या.’
Ticket Booking : आता Whatsapp वरून बुक करता येणार बस तिकीट, समजून घ्या कसं?
रणदीप हुडाचं ‘ते’ वागणं खुपलं?
महेश मांजरेकर यांच्या म्हणण्यानुसार, ‘रणदीपला हिटलर, इंग्लंडचा राजा आणि पंतप्रधान यांचाही स्क्रिप्टमध्ये समावेश करायचा होता. त्याला लोकमान्य टिळकांची ‘स्वराज हा आमचा जन्मसिद्ध हक्क’ ही घटना चित्रपटात समाविष्ट करायची होती. मला वाटले की सावरकरांच्या बायोपिकचा अर्थ काय? मी त्याच्याशी बोललो. मी त्याला हे ही सांगितलं की, अॅटनबरोने जेव्हा गांधींचा बायोपिक बनवला तेव्हा त्या चित्रपटाचा संपूर्ण फोकस फक्त गांधीजींवर होता. त्यांच्या मुलालाही या चित्रपटात स्थान देण्यात आले नव्हते. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. पण तो ठाम राहिला. कारण त्यांनी या चित्रपटासाठी बरीच पुस्तके वाचली होती.’
‘चित्रपटाच्या स्टोरीत अशा काही गोष्टी जोडल्या जाऊ लागल्या, ज्यात कोणतेही तथ्य नव्हते. रणदीपला चित्रपटात सावरकरांसोबत भगतसिंग यांचा सीन जोडायचा होता. जरी असे काही घडले नव्हते. काही दिवसांपूर्वी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यात, ‘गांधी वाईट नव्हते पण, ते त्यांच्या अहिंसावादी विचारांवर अडून राहिले नसते तर भारत ३५ वर्षांपूर्वीच स्वतंत्र झाला असता.’
‘चित्रपटातील या डायलॉगमुळे मोठा गोंधळ उडाला होता. कारण 1915 मध्ये गांधीजी भारतात परतले. पण चित्रपटातील संवादानुसार भारत 1912 मध्येच स्वतंत्र व्हायला हवा होता. महेश मांजरेकर म्हणतात की, हा त्यांनी लिहिलेला डायलॉग नाही. कारण ते चित्रपटांसाठी डायलॉग लिहित नाहीत. चित्रपटाचे डायलॉग लिहिण्यासाठी उत्कर्ष नैथानी याला साइन करण्यात आले होते. चित्रपटात अशा अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला होता, ज्या त्याला नको होत्या.’ महेश मांजरेकर म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांवर महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी संतापले, म्हणाले, ‘तुमचे हात…’
रणदीप हुडा सावरकरांच्या भूमिकेत खूपच गुंतला होता!
महेश मांजरेकर म्हणाले, ‘चित्रपटातील सर्वात मोठी अडचण म्हणजे रणदीप यात खूप गुंतला होता. मी जेव्हाही त्यांला भेटायला जायचो, तेव्हा तो सावरकरांसारखेच कपडे घालायचा. मी सावरकरांशी नव्हे तर त्यांच्याशी बोलायला जायचो. मला सावरकरांवर चित्रपट बनवायचा होता. त्यामुळे मला त्याच्याशी बोलताच येत नव्हतं.’
‘रणदीप यांच्या दररोजच्या हस्तक्षेपामुळे मला काम करणं अवघड जाऊ लागलं. याबाबत मी चित्रपटाच्या निर्मात्यांशी चर्चा केली. मी सरळ सांगितलं की जर मी आणि रणदीप या चित्रपटाचा भाग राहिलो तर हा चित्रपट कधीच बनू शकणार नाही. यामुळे मी स्वत: यामधून बाहेर पडलो.’
सावरकरांवरच पण, दुसऱ्या निर्मात्यांसोबत चित्रपट बनवू शकत नाही का?
यावर महेश म्हणाले की, ते नक्कीच असं करू शकतील. पण रणदीपने आपल्यासोबत जे केले, तेच आपण रणदीपसोबत करावे, हे त्यांना योग्य वाटत नाही. त्यामुळे दुसऱ्या निर्मात्यासोबत चित्रपट बनवण्याचा विचार सोडून दिला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT