मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या का केली? अरबाज खानचा VIDEO आला समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Malaika Arora Father Anil Arora Suicide Reason
Malaika Arora Father Anil Arora Suicide Reason
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या का केली?

point

अनिल अरोरा यांच्या आत्महत्येमुळं बॉलिवूड विश्वात खळबळ

point

सोशल मीडियावर अरबाज खानचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Malaika Arora Father Anil Arora Suicide Reason : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोर यांनी इमारतीच्या छतावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अनिल अरोरा यांनी सकाळी 9 वाजता वांद्रे येथील इमारतीवरून उडी मारून स्वत:चं जीवन संपवलं. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मलायकाच्या वडिलांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल का उचललं? यामागे नेमकं कारण काय आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरावर दुख:चा डोंगर पसरला आहे. मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पण या आत्महत्येचं कारण काय? असा सवाल अनेकांना पडला आहे. याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आली नाही. पोलिसांकडून याप्रकरणी कसून चौकशी केली जात आहे.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! ऑनलाईन फॉर्मची प्रक्रिया बंद! आता 'असा' करावा लागेल अर्ज

इथे पाहा व्हिडीओ

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरु केला आहे. आता पोलिसांच्या तपासात कोणती माहिती उघड होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मलायका अरोराच्या वडिलांच्या आत्महत्येची बातमी समोर येताच मलायकाचा पहिला पती अरबाज खान सर्वात आधी मलायकाच्या घरी पोहोचला. ज्या ठिकाणी तिच्या वडीलांनी आत्महत्या केलीय. अरबाजचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Viral Video: बाईईई!!! पुराच्या पाण्यात 1.5 किमीपर्यंत कार गेली वाहून, नवरा-बायको छतावर चढले अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी आत्महत्या केल्यानं बॉलिवूड विश्वात आश्चर्याचा धक्का बसला आहे. आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगानं फिरवली आहेत. बॉलिवडूच्या कलाकारांकडून अनिल अरोरा यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी कळताच मलायकाच्या तमाम चाहत्यांनाही धक्का बसला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून मलायकाच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं जात आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT