‘परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट!’ सरसेनापती हंबीररावचा जबरदस्त टिझर पाहिलात का?
लेखक आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या सरसेनापती हंबीरराव मोहिते या सिनेमाची चर्चा चांगलीच होते आहे. या सिनेमाचा टिझर आला आहे. जबरदस्त टिझरला खूप लाईक्स मिळाले आहेत. 18 डिसेंबरला आलेला हा टिझर लोकांच्या पसंतीस उतरतो आहे. या सिनेमात हंबीरराव मोहिते ही भूमिका प्रविण तरडेंनी तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका गश्मीर महाजनीने साकारली आहे. ‘हंसाजी मोहिते, स्वराज्य […]
ADVERTISEMENT

लेखक आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या सरसेनापती हंबीरराव मोहिते या सिनेमाची चर्चा चांगलीच होते आहे. या सिनेमाचा टिझर आला आहे. जबरदस्त टिझरला खूप लाईक्स मिळाले आहेत. 18 डिसेंबरला आलेला हा टिझर लोकांच्या पसंतीस उतरतो आहे. या सिनेमात हंबीरराव मोहिते ही भूमिका प्रविण तरडेंनी तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका गश्मीर महाजनीने साकारली आहे.
‘हंसाजी मोहिते, स्वराज्य हे डोईवर आलेल्या धगधगत्या सूर्यासारखं. ते कायम धगधगतच राहिलं पाहिजे, परकिय आक्रमणांच्या काळरात्री येतच राहतील. अशा काळरात्रींना मधोमध चिरायलाच आपण केशरी रंग बनून जन्माला यायचं.’ ‘स्वराज्यात दोन-दोन वर्ष पाऊस नाही पडला तरीही थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली’ ‘परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट’ हे तीन डायलॉग या टीझरमध्ये आहेत. सिनेमातले संवाद हे प्रविण तरडेंचं वैशिष्ट्य आहे. मुळशी पॅटर्न हा सिनेमा अजूनही संवादांमुळेच लोकांच्या लक्षात आहे. तसाच हा हंबीरराव मोहिते सिनेमाही त्यातल्या संवादांमुळे लक्षात राहिल यात शंका नाही.
प्रविण तरडे यांनी सरसेनापती हंबीरराव या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि अभिनय अशी जबाबदारी स्वीकारली आहे. ती त्याने लिलया पेलली आहे हेच हा सिनेमा सांगून जातो आहे. मुळशी पॅटर्ननंतर प्रविणचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे त्यामुळे साहजिकच या सिनेमाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
हंसाजी मोहिते यांच्या अतुल्य पराक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना हंबीरराव ही पदवी दिली होती. हंबीरराव मोहितेंना पराक्रमाचा वारसा लाभला तो आपल्या कर्तबगार घराण्यातून. आपल्या पूर्वजांप्रमाणेच हंबीररावही शूर आणि पराक्रमी होते. कोणत्याही संकटाला निधड्या छातीने सामोरं जाणाऱ्या या वीराची कथा आता रूपेरी पडद्यावर प्रविण तरडेंच्या सिनेमाद्वारे येते आहे. या सिनेमाचा टिझर हा नेटकऱ्यांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.










