नवाजुद्दीन सिद्दीकी संपवणार होता आयुष्य? नेमकं काय घडलं होतं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

nawazuddin siddiqui says he wants to kill himself
nawazuddin siddiqui says he wants to kill himself
social share
google news

Nawazuddin siddiqui Shocking Statement : बॉलिवूड अभिनेता नवाजूद्दीन सिद्दीकीचा (Nawazuddin siddiqui)  ‘जोगिरा सारा रा रा’ (jogira sara ra ra) हा सिनेमा 12 मे ला रिलीज होणार आहे. या सिनेमाआधी नवाजूद्दीन सिद्दीकीने मोठे खुलासे केले आहेत.नवाजुद्दीन सिद्दीकी स्वत:च आयुष्य संपवणार होता,याबाबत सतत मनात विचार यायचे असे तो म्हणाला आहे. पण यातून नंतर त्याने स्वत:ला सावरल्याचे देखील म्हटले आहे. (nawazuddin siddiqui says he wants to kill himself jogira sara ra ra movie)

तुम्ही अनेक पात्र साकारलीत, पण अशी कोणती पात्र आहेत, ज्यापासून तुम्हाला सुटका करणे खुप कठीण गेले असा सवाल नवाजूद्दीन सिद्दीकीला (Nawazuddin siddiqui) विचारण्यात आला होता.यावर नवाजूद्दीन सिद्दीकी म्हणतो की,रमण राघवन, फोटोग्राफ हे माझ्यासाठी खुप कठीण सिनेमे होते. या सिनेमांची प्रक्रिया वेड लावणारी होती. जेव्हा मी रमण राघवन सिनेमा करत होतो, तेव्हा मला स्वत:वर नियंत्रण ठेवता येत नव्हते. या दरम्यान शुटींगच्या आठवडाभर आधी मी लोणावळ्यात गेलो होतो. तिथे एका छोट्याशा जागेत राहिलो होतो.संध्याकाळ झाली की मला आरसा पाहून स्वत:चीच भीती वाटायची, मी इतका अस्वस्थ होतो की, आयुष्य संपवण्याचे विचार मनात यायचे. यावेळी स्वत:ला खुप समजावण्याचा प्रयत्न केला. मी स्वत:ला घाबरू शकत नाही. मी आयुष्य संपवू शकत नाही, असे स्वत:ला समजावले.

हे ही वाचा : 14 वर्षांचा वनवास अन् रामसेतू, ‘आदिपुरुष’चा ट्रेलर पाहिलात का?

रमन राघवनमधून बाहेर पडायला खुप वेळ लागला. अनके सायकोलॉजिस्टचा फेऱ्या मारल्या. मला तापही आला होता.मी अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतो,असे देखील नवाजुद्दीन सांगतो. मी माझ्या गावी देखील गेलो. गावी जाऊन जर तुम्ही सांगितलंत तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात, तर लोक कानाखाली मारतात. डिप्रेशन,एग्झायटी या शहरांच्या व्याख्या आहेत. येथे तुमच्या भावनांचा गौरव केला जातो, असे देखील नवाज म्हणतो.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जर सिनेमा जास्त इंटेस (भूतकाळात नेणारी) वाली असली, तर मी काही हलके सिनेमे करतो.त्यामुळे समतोल साधता येतो. ठाकरे सिनेमाच्या वेळी मी फोटोग्राफ सिनेमा केला. सिनेमा रीलीजच्या सीक्वेन्सवर माझं लक्ष नसतं. कधी कधी तर एका मागोमाग इंटेस सिनेमेचे रिलीच होतात. पण माझा प्रयत्न इतकाच असतो की दोन्ही विषयात समतोल साधता येईल.

हे ही वाचा : आमिर खान मायानगरीला कंटाळला? चित्रपट सोडून नेपाळ गाठत विपश्यना केंद्रात दाखल

दरम्यान अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा (Nawazuddin siddiqui) आगामी सिनेमा जोगिरा सारा रा रा येत्या 12 मे ला रिलीज होत आहे. या सिनेमात नवाजुद्दीन सोबत अभिनेत्री नेहा शर्मा झळकणार आहे. हा एक कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमाची फॅन्सना उत्सुकता आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT