Nitin Desai च्या आत्महत्येमुळे धक्का! अक्षय कुमारने घेतला मोठा निर्णय

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Nitin Desai, he was found dead in his ND studio. According to the information, Nitin hanged himself at 4:30 am in ND Studio.
Nitin Desai, he was found dead in his ND studio. According to the information, Nitin hanged himself at 4:30 am in ND Studio.
social share
google news

Nitin Desai Suicide, Akshay Kumar : नितीन देसाई यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. नितीन देसाईंनी बुधवारी (2 ऑगस्ट) पहाटे आत्महत्या केली. त्यांच्या निधनाच्या बातमीने सिनेजगतावर शोककळा पसरली आहे. त्याचवेळी त्याच्या मृत्यूचा बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारवरही खोलवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच अक्षयने एक ट्विट करत त्याने चित्रपटाबद्दल निर्णय जाहीर केला आहे. (Entertainment news in Marathi)

अक्षय कुमारने ट्विट करून नितीन देसाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि माहिती दिली की, तो आज OMG 2 चा ट्रेलर रिलीज करणार नाही. अक्षयने लिहिले आहे की, “नितीन देसाई यांचे निधन झाले, यावर विश्वास बसत नाही. हे जाणून मला दुःख झाले. ते प्रॉडक्शन डिझाईनमध्ये एक दिग्गज होता आणि आमच्या सिनेमा जगाचा एक मोठा भाग होता. त्यांनी माझ्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. हे खूप मोठे नुकसान आहे. आदर म्हणून आम्ही आज OMG 2 चा ट्रेलर रिलीज करणार नाही. उद्या सकाळी 11 वाजता लॉन्च होईल. ओम शांती.”

11 ऑगस्टला चित्रपट होणार प्रदर्शित

अक्षय कुमारने सांगितले की आता त्याच्या OMG 2 चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी म्हणजेच 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता प्रदर्शित होणार आहे. अक्षयच्या या निर्णयामुळे चाहतेही खूप खूश झाले. सर्वांनी अभिनेत्याचे अभिनंदन केले आणि नितीन देसाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्याबरोबरच अक्षयला त्याच्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. OMG2 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> Nitin Desai Suicide अन् Audio क्लिप… ‘ते’ 4 उद्योजक कोण?, Inside स्टोरी

या चित्रपटाची टक्कर सनी देओलच्या गदर 2 या चित्रपटाशी होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत पंकज त्रिपाठी, यामी गौतम देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा एक कॉमेडी चित्रपट आहे, ज्याद्वारे निर्मात्यांनी सामाजिक विषयावर संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

वाचा >> नितीन देसाईंनी ND स्टुडिओमध्येच का संपवलं आयुष्य, ‘ते’ प्रकरण काय?

ADVERTISEMENT

नितीन देसाईंवर 180 कोटींचे कर्ज

नितीन देसाई यांच्याबद्दल सांगायचे तर ते त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाईंनी पहाटे साडेचार वाजता एनडी स्टुडिओमध्ये गळफास लावून घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण कर्ज असल्याचे सांगितलं जात आहे. काल रात्री दहा वाजता ते त्यांच्या खोलीत गेले होते.
बुधवारी (2 ऑगस्ट) सकाळी ते बराच वेळ बाहेर आले नाही. त्यानंतर त्यांचा बॉडीगार्ड आणि इतर लोकांनी दरवाजा ठोठावला, मात्र दरवाजा न उघडल्याने पोलिसांना कळवण्यात आले.

ADVERTISEMENT

वाचा >> Nitin Desai : खिडकीतून बघितलं अन् बॉडीगार्ड हादरला; एनडी स्टुडिओत काय घडलं?

त्यानंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. नितीन देसाईंवर 180 कोटींचे कर्ज होते, अशी माहिती आहे. नितीन देसाई हे आर्थिक अडचणीत आले होते आणि त्यामुळे त्रस्त झाले होते. वाढत्या कर्जामुळे आणि स्टुडिओवर जप्ती येण्याच्या तणावातून त्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे सांगितले जात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT