Porn films case : ‘राज कुंद्राला पाठिंबा अन् मुंबई पोलिसांना उघडं पाडल्यानंच गहनावर गुन्हा’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पॉर्न चित्रपट निर्मिती प्रकरणी सध्या जामीनावर असलेल्या अभिनेत्री व निर्माती गहना वशिष्ठ मुंबई सत्र न्यायालयात झटका बसला आहे. गहना वशिष्ठचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. राज कुंद्रा आरोपी असलेल्या प्रकरणात पोलिसांनी गहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने केलेल्या कारवाईत पॉर्न फिल्म्स रॅकेट प्रकरणाचा (Porn films Racket case) पर्दाफाश केला होता. याच प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी उद्योगपती राज कुंद्राला अटक केली होती. या प्रकरणात पोलिसांनी गहना वशिष्ठविरुद्धही गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी २७ जुलै रोजी अश्लील साहित्याची विक्री, महिलांची प्रतिष्ठा भंग करणारं साहित्य यासह विविध कलमान्वये गहना वशिष्ठविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पॉर्न चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या गहना वशिष्ठने अश्लील चित्रपटात काम करण्यासाठी पैशांचं आमिष दिलं आणि धमकावलं होतं, अशी तक्रार काही महिलांनी दिल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या प्रकरणात पोलिसांकडून अटक केली जाण्याची भीती असल्यानं अभिनेत्री गहना वशिष्ठने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. गहनाने मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश सोनाली अगरवाल यांनी या प्रकरणावर आदेश राखून ठेवला होता. आज न्यायालयाने गहनाची अटकपूर्व याचिका फेटाळून लावली.

‘राज कुंद्राला पाठिंबा, मुंबई पोलिसांचा पर्दाफाश केल्यानं गुन्हा’

ADVERTISEMENT

मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका करणाऱ्या गहना वशिष्ठच्या वकिलांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केला. गहना वशिष्ठने या प्रकरणातील सहआरोपी राज कुंद्रा यांची बाजू घेतली. त्यांना पाठिंबा दिल्यानं मुंबई पोलिसांनी पॉर्न फिल्म्स रॅकेट प्रकरणात नव्याने गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोपा गहनाच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. इतकंच नाही तर अटक टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी पैसे मागितले होते, असं सांगून पोलिसांना उघडं पाडल्यानंही हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप गहनाच्या वकिलांनी न्यायालयात केला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT