महिन्याभरात दिला महामंडलेश्वर पदाचा राजीनामा, ममता कुलकर्णीसोबत असं काय घडलं?
Mamta Kulkarni Mahamandaleshwar: अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने अगदी महिन्याभराच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आहे. पण हे नेमकं का घडलं?
ADVERTISEMENT

Mamta Kulkarni News: अभिनेत्री ममता कुलकर्णी ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने नुकतेच महाकुंभमेळ्यात पिंड दान केलं होतं. यानंतर, तिला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर बनवण्यात आले. पण यावर बराच वाद झाला. आता तिने या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे.
ममताने राजीनामा दिला
तिने किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आहे. ममता म्हणाली की, "मी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा देत आहे. मी लहानपणापासूनच साध्वी आहे आणि भविष्यातही तशीच राहीन..."
हे ही वाचा>> Mamta Kulkarni: बोल्ड सीनचा धुरळा उडवणारी ममता कुलकर्णी बनली संन्यासी, किन्नर आखाड्याची...
ममताला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर बनवण्यावरून बराच वाद झाला. हा वाद हाताबाहेर जात असल्याचे पाहून ममतानी हा निर्णय घेतला आहे. तथापि, तिने स्पष्ट केले की, ती तिचे जीवन साध्वीसारखे जगेल.
ममतावर उपस्थित केले गेले प्रश्न
प्रयागराज महाकुंभात, ममताने किन्नर आखाड्यात पूर्ण दीक्षा घेतली होती आणि त्यानंतर तिला लगेचच महामंडलेश्वर बनवण्यात आले. तिने पिंडदान केले, संगमात स्नान केले, नंतर तिला अभिषेक करून महामंडलेश्वर बनवण्यात आले. ममता कुलकर्णी महामंडलेश्वर होताच अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ लागले.










