Shirish Kanekar Passed Away : जेष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे निधन!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shirish Kanekar : ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर (Shirish Kanekar) यांचं आज (25 जुलै) निधन झालं. मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात त्यांनी 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कणेकरांच्या निधनानं पत्रकारिता, साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालं असल्याचे समजते. (Senior journalist writer Shirish Kanekar passed away)

शिरीष कणेकर यांचा जन्म 6 जून 1943 रोजी पुण्यात झाला. ते मुळचे रायगड जिल्ह्यातील पेणचे होते. वडील रेल्वेमध्ये डॉक्टर असल्याने शिरीष कणेकरांचे बालपण भायखळ्याच्या रेल्वे रूग्णालयाच्या सरकारी निवासस्थानामध्ये गेले.

Pune Crime : ‘तुलाही गोळी घालेन’, पत्नी-पुतण्याची हत्या, स्वतःवर झाडली गोळी, नेमकं काय घडलं?

कणेकरांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए एल.एल.बी मध्ये पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी मराठी लेखक, पत्रकार आणि कथनकार म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. त्यांची विशेष ओळख विनोदी लेखन आणि क्रीडा पत्रकारितेसाठी होती. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारणावरील त्यांचे वृत्तपत्रांतील स्तंभ प्रसिद्ध आहेत. ‘लगाव बत्ती’ या त्यांच्या कथासंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विनोदी वाङ्‌मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कार मिळाला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Manipur : आमदाराला शॉक, स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीला जिवंत जाळले; तरीही…

Shirish Kanekar यांची कारकीर्द

शिरीष यांनी पत्रकार म्हणून इंडियन एक्स्प्रेस, फ्री प्रेस जर्नल या प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रांसाठी काम केलं. याशिवाय लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना आणि जवळपास सगळ्याच मराठी वृत्तपत्रांतील त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध होते. त्याचप्रमाणे साप्ताहिक मनोहर, लोकप्रभा, चित्रलेखामधील त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत. तसंच, त्यांची रंगमंचीय कारकीर्दही विशेष आहे. 7 नोव्हेंबर 1987 रोजी त्यांनी रंगमंचावर पदार्पण केलं. भारतीय रंगमंचावर पहिल्यांदा ‘स्टॅन्ड अप कॉमेडी’ कणेकरांनी आणली. माझी फिल्लमबाजी, फटकेबाजी आणि कणेकरी या तीन एकपात्री कार्यक्रमांचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि सादरीकरण त्यांनी केले.

Jayant Savarkar passed away : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर काळाच्या पडद्याआड

मनोरंजन क्षेत्राला आणखी एक धक्का!

सोमवारी (24 जुलै) ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यामुळे मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरलेली असतानाच आज (25 जुलै) शिरीष कणेकर यांच्या निधनाने पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. दोघांच्या जाण्याने मराठी मनोरंजन क्षेत्राने कसदार व्यक्तीमत्त्व गमावले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT