SRK : शाहरुखच्या ‘मन्नत’ बाहेर पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज, कारण…

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

shah rukh khan greet fans on eid, meanwhile police lathi charge out side of mannat video
shah rukh khan greet fans on eid, meanwhile police lathi charge out side of mannat video
social share
google news

बॉलिवूडचा बादशाह किंग शाहरुख खानच्या बातम्या नेहमीच येत असतात. यावेळी असं काही घडलं की, शाहरुख खानचा मन्नत बंगला चर्चेत आला आहे. शाहरुखला बघण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच मन्नत बंगल्याबाहेर असतात. वेगवेगळ्या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीही मन्नतबाहेर मोठी गर्दी असते. अशाच गर्दीमुळे मुंबई पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला ईद निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी मन्नत बाहेर प्रचंड गर्दी झाली होती. दरवर्षीप्रमाणे किंग खान त्याच्या चाहत्यांना भेटण्यासाठी मन्नत बाहेर आला. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधील पोझ देऊन शाहरुख खानने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा >> गौरीने शाहरुख खान हिंदू असल्याचं सांगितलं होतं घरी; ठेवलं होतं अभिनव नाव

शाहरुख खानसोबतच त्याचा लहान मुलगा अबराम खानही यावेळी चाहत्यांना भेटण्यासाठी मन्नतच्या गॅलरीत आले होते. दोघांनीही पांढरेशुभ्र कपडे परिधान केलेले होते.

हे वाचलं का?

धावपळ आणि लाठीचार्ज

शाहरुख खान गॅलरीत आल्यानंतर मन्नत बाहेर चाहत्यांची संख्या वाढली. गर्दी वाढल्याने लोक रस्त्यावर आले. त्यामुळे पोलिसांना त्यांना हटवण्याचं काम करावं लागलं. लोक बाजूला जात नसल्याचं बघून पोलिसांना शेवटी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे चाहत्यांची धावपळ झाली. यात कुणीही जखमी झालं नाही.

ADVERTISEMENT

शाहरुख घरात परतला आणि मन्नतबाहेर…

ईद निमित्ताने शाहरुख खानने गॅलरीत येऊन चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, त्यानंतर पोलिसांनी गर्दीला आवरण्यासाठी लाठीचार्ज केला. त्यानंतर शाहरुख खान आणि अबराम दोघेही परत गेले. त्यानंतर मन्नत बाहेरील चाहत्यांची गर्दी हळूहळू ओसरली आणि नंतर कुणीही मन्नत बाहेर दिसत नव्हतं.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Kapil Sharma: शाहरूख खान कपिलला म्हणाला,”तू ड्रग्ज घेतोस का?”, नेमकं काय घडलं होतं?

शाहरुख खानच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर यावर्षी जानेवारीमध्ये शाहरुखचा पठाण चित्रपट प्रदर्शित झाला. अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत शाहरुख खान मोठ्या पडद्यावर दिसला. शाहरुख खानने या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागम केले.

पठाण चित्रपटाने 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत असून, शाहरुख खानच्या अभिनयाचं त्यांच्या चाहत्यांनी कौतुक केलं. आगामी काळात शाहरुख खानचे काही चित्रपट बघायला मिळणार असून, या प्रोजेक्टमध्ये शाहरुख खान व्यस्त आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT