Shreyas Talpade : “मी मेलो होतो, हा माझा दुसरा जन्म”, श्रेयसने सांगितला हार्ट अटॅकचा भयंकर अनुभव

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

shreyas talpade heart attack story reveal he was clinically dead heart attack bollwoo actor welcome to the jungle movie shooting
shreyas talpade heart attack story reveal he was clinically dead heart attack bollwoo actor welcome to the jungle movie shooting
social share
google news

Shreyas Talpade Heart Attack Story : बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याला काही दिवसांपूर्वीच हार्ट अटॅक आला होता. या हार्ट अटॅकमधून (Heart Attack) तो आता पूर्णपणे बरा झालाय. त्यानंतर आता श्रेयस तळपदेने हार्ट अटॅकचा भयानक अनूभव सांगितला.मी मेलोच होतो, हा माझ्या दुसरा जन्म झाल्याचे आता श्रेयस तळपदे सांगतो. ना मी सिगारेट पितो, ना मी दारू पितो, हेल्थी जीवनशैलीचे पालन करून देखील माझ्यासोबत ही घटना घडल्याचे देखील तळपदे येथे अधोरेखित करतो आहे. (shreyas talpade heart attack story reveal he was clinically dead heart attack bollwoo actor welcome to the jungle movie shooting)

ADVERTISEMENT

अभिनेता श्रेयस तळपदे डिसेंबर महिन्यात ‘वेलकम टू द जंगल’ (welcome to the jungle)  सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त होता. 14 डिसेंबरला शुटींग करत असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले होते, त्यामुळे तो घरी निघून गेला होता. घरी पोहोचल्यावर श्रेयसची अवस्था पाहून त्याच्या बायकोने त्याला रूग्णालयात दाखल केले होते.यावेळी डॉक्टरांनी त्याला हार्ट अटॅक आल्याची माहिती दिली. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर अँजिओप्लास्टी करून त्याचा जीव वाचवला होता. आता श्रेयस तळपदेने हार्ट अटॅकपूर्वी त्याच्यासोबत घडलेली संपूर्ण घटना सांगितली आहे.

हे ही वाचा : Lok Sabha : महायुतीचे जागा वाटप कधी? शिंदेंच्या मंत्र्याने दिली महत्वाची माहिती

मी माझ्या आयुष्यात रूग्णालयात कधीच अॅडमीट झालो नव्हतो. पण माझ्या घरातील अनेकांना यापूर्वी हार्ट अटॅक येऊन गेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा ज्यावेळेस मी रूग्णालयात अॅडमीट झालो, त्यावेळेस कळालं की ‘जान है तो जहान है’, असे श्रेयस तळपदे सांगतो. तसेच मी गेल्या 20 वर्षापासून सतत काम करतोय आणि आता मी 47 वर्षाचा झालो आहे. गेल्या काही महिन्यापासून मी कामात खूपच व्यस्त आहे. ज्यामुळे मला थकवा जाणवतोय. त्यामुळे मी बॉडी चेकअप केल्याचे श्रेयस तळपदेने सांगितले.

हे वाचलं का?

मी माझ्या ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमाचे शुटिंग करत होतो. या शूटच्या दरम्यान मी मिलेट्री एक्सरसाईज केली होती. शुटिंग संपल्यानंतर माझ्या डावा हात दुखायला सूरूवात झाली होती. श्वास घेण्यासही मला अडचण येत होत्या. माझं हे दुखणे इतके जास्त होते की, मी कपडे बदलण्यासाठी व्हॅनिटी व्हॅनपर्यंत देखील जाऊ शकत नव्हतो, असे श्रेयस तळपदे सांगतो.

शुटिंग संपल्यानंतर जसे मी घरी पोहोचलो, त्यानंतर माझी बायको दिप्तीने माझी अवस्था पाहिली आणि तत्काळ मला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातल्या डॉक्टरांनी तत्काळ माझ्यावर उपचार सूरू करत, मला सीपीआर आणि शॉक ट्रिटमेंट देऊन पुन्हा जिवंत केले. त्यावेळेस दिप्तीची मी माफी मागितली.माझ्यामुळे तुला जो त्रास होतोय, त्यासाठी मला माफ कर, असे तळपदे बायकोला म्हणाला होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा :BJP Video : “…तर मोदींशिवाय पर्याय नाही”, संजय राऊतांना भाजपने दाखवला ‘तो’ व्हिडीओ

दरम्यान रुग्णालयात ज्यावेळेस माझ्यावर उपचार सुरु होते. त्यावेळेस मी काही मिनिटांसाठी मेडिकलीदृष्ट्या मृतच झाल्याचेही श्रेयस तळपदे सांगतो. या हार्ट अटॅकमधून सावरल्यानंतर श्रेयस तळपदे सांगतो की, तुमच्या आरोग्याला अजिबात हलक्यात घेऊ नका. डॉक्टरांकडे जाऊन रेग्युलर चेकअप करा. मी सिगरेट पित नाही, ना मी दारू पितो, हेल्थी जीवनशैलीचे पालन करून देखील माझ्यासोबत ही घटना घडली आहे. जर या सर्व गोष्टी करून देखील माझ्यासोबत ही घटना घडू शकते, तर सिगारेट आणि दारू पित असलेल्यांसोबत काय होत असेल, असेही श्रेयस तळपदे म्हणाला आहे.

ADVERTISEMENT

मी अस ऐकलं आहे की, कोविड नंतर अनेकांना हार्ट अटॅकचा त्रास होतोय. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे श्रेयस तळपदे याने सांगितले. तसेच माझ्या कठीण वेळेत माझी साथ दिल्याबद्दल बायको दिप्ती आणि माझ्या चाहत्यांचे मी आभार मानतो,असे देखील श्रेयस तळपदे म्हणाला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT