सोनाक्षी सिन्हाची वेब सिरीजमध्ये एन्ट्री; दिसणार दबंग भूमिकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नुकतंच अभिनेत्री जुही चावला आणि आयेशा झुल्का यांनी वेब सिरीजमध्ये पदार्पण केलं आहे. त्यानंतर आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सुद्धा वेब सिरीजमध्ये झळकणार आहे. अॅमेझॉन प्राईमच्या एका वेब सिरीजमध्ये सोनाक्षी पोलिसांच्या भूमिकेत दिसून येणार. तिचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

महिला दिनाच्या निमित्ताने सोनाक्षीचा या सिरीजमधील फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. या वेब सिरीजमध्ये सोनाक्षीसोबत विजय वर्मा, गुलशन देवैया तसंच सोह शहा पण दिसणार आहेत. या वेब सिरीजचं डायरेक्शन रिमा कागती आणि रूचिका ऑबेरॉय यांनी केलं आहे.

या बेव सिरीजच्या फर्स्ट लूकमध्ये सोनाक्षी एकदम दमदार अवतारात दिसून येतेय. या फोटोत सोनाक्षी एका रेल्वे ट्रॅकवर उभी असलेली दिसून येतेय. अजून या वेब सिरीजचं नाव ठरलेलं नाही. मात्र सोनाक्षी सिन्हाला पोलिसांच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने देखील तिचा हा नवा लूक सोशल मीडियावर शेअर आहे. या फोटोला कॅप्शन देताना सोनाक्षी म्हणते, “महिला काय करू शकतात, याती सीमा नाहीये. महिला दिनाच्या निमित्ताने महिला तसंच मुली काय करू शकतात हे पुन्हा एकदा दाखवण्यासाठी फार उत्सुक आहे. लवकरच अॅमेझॉन प्राईमवर..”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT