कंगनाला हाकलणं आणि माझं ट्विटवर येणं हा योगायोग; सुव्रत जोशीची मजेशीर पोस्ट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अक्टिव्ह असतो. नुकतंच सुव्रतने अजून एका सोशल मीडियावर त्याचं अकाऊंट सुरु केलंय. सुव्रतने ट्विटरवर एन्ट्री घेतली असून त्यानंतर त्याने एक हटके पोस्टही केली होती.

ADVERTISEMENT

सु्व्रतने मंगळवारी ट्विटवर त्याचे अकाऊंट सुरू केलं. या अकाऊंटचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करताना लिहिलं आहे, “आईची शप्पथ…हिला हाकलणं आणि मी ट्विटरवर येणं याचा एकमेकांशी काहीही संबंध नाहीये! मी तिची जागा घेऊ इच्छित नाही आणि ती उडवते तसे ज्ञानशिंतोडे उडवायची माझ्या मेंदूची क्षमताही नाही. तर माझी टिव्हटीव्ह तिथेही सुरू करतोय… Follow करा!”

सुव्रतची ही इन्स्टाग्राम पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली. अनेकांनी या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला. मात्र सुव्रतने काही वेळानंतर ही पोस्ट डिलीट केली.

हे वाचलं का?

मंगळवारी कंगनाचं ट्विट अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं होतं. पश्चिम बंगाल निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कंगनाने ममता बॅनर्जी यांच्यावर टिका केली होती, या कारणामुळे कंगनाचं अकाऊंट सस्पेंड केलं गेलं. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेस विजयी झाल्यानंतर कंगनाने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. अभिनेत्री कंगना रणौतने मायक्रो-ब्लॉगिंग साईटच्या नियमांविरूद्ध मजकूर पोस्ट केल्यानंतर तिचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT