मुंबईत पूर आला अन् प्रेग्नेंट बायको कारमध्ये…., माधवनने सांगितला काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग
आर माधवनची ‘द रेल्वे मॅन’ ही वेबसिरीजच्या निमित्ताने आता त्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. ही चर्चा चालू असतानाच आर माधवाने त्याच्या आयुष्यातील एक आठवण सांगितली आहे. तो म्हणतो की, ‘द रेल्वे मॅन’मधील व्यक्तीरेखा या फक्त वेबसिरीजमध्येच नाहीत तर त्या मुंबईत आहेत आणि तशाच त्या चेन्नईतही आहेत.
ADVERTISEMENT
आर माधवन म्हणजे साऊथ आणि बॉलिवूडमधील एक भारदस्त नाव. अलीकडेच त्याची ‘द रेल्वे मॅन’ ही वेबसिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या वेबसिरीजची कथा आहे ती 1984 मध्ये घडलेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित. त्या दुर्घटनेत ज्या लोकांनी मदतीसाठी कशाचाही विचार केला नव्हता त्या धाडसी लोकांवर ही वेबसिरीज आधारित आहे. जी लोकं कधी काळी अगदीच सामान्य होती, मात्र ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी त्याच सामान्य लोकांनी हजारो जीव वाचवले होते. त्या लोकांना या वेबसिरीजच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच ‘द रेल्वे मॅन’ ही खास ठरत असते.
ADVERTISEMENT
कडू गोड आठवणी
याच वेबसिरिजमध्ये आर माधवन यांनी भूमिका केली आहे. त्या भूमिकेविषयी बोलताना त्यांनी अनेक गोष्टींना उजाळा दिला आहे. नेटफ्लिक्सवर झालेल्या एका मुलाखतीत त्याने साकारलेली भूमिका, त्यासाठी केलेली तयारी आणि पत्नी सरिता बिर्जेविषयी त्याने काही आठवणी सांगितल्या आहेत.
हे ही वाचा >> Viral Video : दोघींचा एकावरच जीव जडला, चहाच्या टपरीवर तुफान भिडल्या!
जीवाची बाजी लावणारा रती पांडे
आर माधवनने ‘द रेल्वे मॅन’ या वेबसिरीजमध्ये रती पांडे नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. रती पांडे हा कोणत्याही लोकांना मदत करण्यासाठी अगदी जीवाची बाजी लावत असतो. त्यामुळेच या व्यक्तिरेखेविषयी बोलताना आर माधवन म्हणाला की, ती दुर्घटना इतकी भयंकर होती की, आजही तेथील काही लोकं त्या धक्क्यातून अजून सावरली नाहीत.
हे वाचलं का?
अशी कथा लोकांसमारे यावी
जेव्हा वेबसिरीजचा दिग्दर्शक ही कथा घेऊन माझ्याकडे आला तेव्हा मला त्या दुर्घटनेत आणखी काय काय घडले होते, त्या संबंधित आणखी कोण कोण माणसं होती. त्या अपघातातील लोकांना मदत कशी मिळाली यावरही थोडंफार संशोधन करता आले. त्यामुळे त्यावेळी वाटले की, या प्रकारची कथा लोकांसमोर येणं ही या काळाची गरज आहे.
माणुसकी मोठी
या वेबसिरीजचे एक महत्वाचे वैशिष्ट्ये हे आहे की, त्या वास्तव घटनेत कोणतीही छेडछाड न करता, नाट्यमय घडामोडींवर ही कथा दाखवली आहे. ज्या लोकांनी मोठ्या धाडसाने अनेकांचे जीव वाचवले होते, त्या लोकांचे शौर्य यामध्ये दाखवण्यात आले आहे. कारण माणुसकीच्या पलिकडे जाऊन त्यातील काही लोकांनी अपघातग्रस्त लोकांसाठी त्यांनी मदत केली होती. त्यातीलच एक रती पांडे ही व्यक्तिरेखा होती. रती पांडे ही व्यक्ती अपघात पाहून म्हणते की, अपघातातील लोकांना वाचवण्याचे धाडस अशीच लोकं करतील जी माणुसकीच्या ध्येयाने पछाडलेली होती. ज्यांना सगळ्यांपेक्षा माणुसकी मोठी वाटत होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> 300 रूपयांसाठी नग्न केलं, नंतर धारदार शस्त्राने… ठाण्यात मुलासोबत नेमकं काय घडलं?
मी ती मुंबई बघितली
आर माधवनने पुढे असंही सांगितले की, अशा घटना, कथा ऐकल्या की, काही आठवणी आठवतात आणि माझ्या अंगावरही शहारे येतात. कारण रती पांडे यांच्यासारखी माणसं फक्त भोपाळमध्येच आहेत असं नाही तर तशी माणंस मुंबईत आहेत, चेन्नईत आहेत. मात्र ज्यावेळी दुर्घटना घडते त्यावेळी आपल्यातील सगळे भेद मतभेद दूर होतात आणि काही माणसं अशी पुढं येतात. कारण मी मुंबई बघितली आहे.
ADVERTISEMENT
लोकांनी कारच उचलली
माझ्या मुलाचा जन्म झाला होता तेव्हा 2005 मध्ये मुंबई पावसामुळे पूरात होती. त्या पावसातील पुरामध्ये माझी पत्नी सापडली होती आणि ती 9 महिन्याची गरोदरही होती. मात्र त्यावेळी नात्यागोत्यातील माणसंही एवढी मदत करु शकणार नाहीत तेवढी मदत त्यावेळी मुंबईतील माणसांनी केली आहे. त्या भरपावसात ज्या कारमध्ये माझी पत्नी अडकली होती ती कार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उचलून सुरक्षित ठेवली होती. मात्र त्यावेळी कारमध्ये कोण महिला आहे, ती कोण आहे हेसुद्धा मुंबईतील त्या लोकांना माहिती नव्हते.
चॅम्पियन; वेदांत माधवन
आर माधवनने 1999 मध्ये फॅशन डिझायनर सरिता बिर्जेबरोबर लग्न केले होते. या दोघांना एक मुलगा असून त्याचे नाव वेदांत माधवन आहे. वेदांतचा जन्म 21 ऑगस्ट 2005 रोजी झाला होता. तो जलतरणपटू असून त्याने अजूनपर्यंत ज्युनियर नॅशनल एक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये 4 सुवर्ण आणि 3 रौप्य पदके जिंकली आहेत. ‘द रेल्वे मेन’मध्ये त्याच्यासोबतच केके मेनन, बाबिल खान, जुही चावला, दिव्येंदू आणि सनी हिंदुजा यांनी काम केले आहे.
हे ही वाचा >> MLA Disqualification: ठाकरे गटाने दिलेले ‘ते’ 23 पुरावे, जसेच्या तसे, ‘त्या’ आमदारांचं काय होणार?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT