Bollywood : सलमान खानसोबत गेल्या 30 वर्षात पहिल्यांदाच असं घडलंय…

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

This is first time happened to Bollywood Salman Khan in the last 30 years
This is first time happened to Bollywood Salman Khan in the last 30 years
social share
google news

Salman Khan : बॉलिवूडचा दबंग, सलमान खान (Salman Khan) गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडला आहे. त्याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. पण आता सलमानसोबत असं काहीतरी झालं आहे जे गेल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत कधीच घडलं नव्हतं. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा त्याच्याकडे एकही चित्रपट नाही आहे. चित्रपट नाहीतच असं नाही पण सलमानला सावधगिरीनेच चित्रपट निवडायचा आहे. पुढचा चित्रपट सुरू करण्याच्या दबावाखाली कोणताही निर्णय घाईघाईने घ्यायचा नाहीये. सलमानचे पुढचे वर्ष पूर्णपणे Tiger vs Pathaan च्या शूटिंगमध्ये जाणार आहे. (This is first time happened to Bollywood Salman Khan in the last 30 years)

ADVERTISEMENT

सलमानचे व्यस्त वेळापत्रक! असं करावं लागणार शूटिंग…

‘शिवसेनेतून राणे गेले तेव्हाच बाहेर पडलो असतो..’, गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

मिळालेल्या माहितीनुसार, जर सलमानला TVP पूर्वी चित्रपट पूर्ण करायचा असेल तर त्याला लवकरात लवकर त्याचे शूटिंग सुरू करावे लागेल. कारण सलमान आणि शाहरुखचे ‘टायगर व्हर्सेस पठाण’चे शूटिंग फेब्रुवारी-मार्च 2024 पासून सुरू होणार आहे. तारखा अजून ठरलेल्या नाहीत.

सलमान खान सूरज बडजात्या यांच्या ‘प्रेम की शादी’ या चित्रपटातही दिसणार आहे. पण सूरज यांची स्क्रिप्ट अजून फायनल झालेली नाही. सलमानही त्याच्यावर दबाव टाकू इच्छित नाही. कारण घाई केल्याने स्क्रिप्टचेच नुकसान होईल. याशिवाय करण जोहरच्या प्रोडक्शनमध्ये विष्णू वर्धनसोबत एक चित्रपटही आहे. त्यासाठी सातत्याने बैठका सुरू आहेत. हा एक मोठा चित्रपट असणार आहे. ज्याच्या तयारीलाच 4-5 महिने लागणार आहेतय. त्यामुळेच ‘टायगर व्हर्सेस पठाण’ नंतर याचे शूटिंग सुरू होऊ शकते. असे म्हटले जात आहे.

हे वाचलं का?

Covid Centre scam : ठाकरेंच्या नेत्यांना अडचणीत आणणारं ‘हे’ प्रकरण काय?

या दोन चित्रपटांशिवाय सलमान आणि अली अब्बास जफर एकत्र येणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यांचीही लवकरच बैठक होणार असल्याचे म्हटले जात आहे. सलमानला ते योग्य वाटले तर हा प्रोजेक्ट पुढे जाण्याची शक्यता आहे.

याशिवाय ‘किक 2’ देखील येणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण साजिद नाडियादवाला यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाहीये. सलमानचा मागील चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ होता. जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. तर, पुढचा चित्रपट ‘टायगर 3’ आहे. जो दिवाळीच्या मुहूर्तावर 10 नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT