Video : ‘टायगर’ची एन्ट्री होताच थिएटरमध्ये फोडले फटाके, सलमान चाहत्यांवर प्रचंड भडकला
चाहत्यांनी थेट सलमानच्या एन्ट्रीवर थिटएरमध्ये फटाकेच फोडले आहेत. या संबंधित व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घटनेवर आता अभिनेता सलमान खान प्रतिक्रिया दिली आहे. तसेच चाहत्यांना आवाहन देखील केले आहे.
ADVERTISEMENT
Salman khan Reaction on fans Burst Cracker inside Theater : बॉलिवूडचा टायगर सलमान खान (Salman Khan) याचा नुकताच टायगर 3 (Tiger Movie) सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झाला आहे.या सिनेमाची क्रेझ इतकी आहे की सकाळी 6 वाजताचे शो देखील हाऊसफुल दाखवताय. अशात थिएटर्समध्ये तर वेगळाच उत्साह आहे. सलमानच्या एन्ट्रीवर टाळ्या, शिट्ट्या मारल्या जातायत. एका ठिकाणी तर हद्दच झाली. चाहत्यांनी थेट सलमानच्या एन्ट्रीवर थिटएरमध्ये फटाकेच फोडले आहेत. या संबंधित व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घटनेवर आता अभिनेता सलमान खान प्रतिक्रिया दिली आहे. तसेच चाहत्यांना आवाहन देखील केले आहे. (tiger 3 movie actor salman khan reaction on fans burst cracker inside theater video viral in social media katrina kaif imaraan hashmi)
ADVERTISEMENT
व्हिडिओत काय?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ एका थिएटरमधला आहे. या व्हिडिओत थिएटरमध्ये सलमान खानचा टायगर सिनेमा सुरु आहे. या सिनेमातील सलमान खानच्या एन्ट्रीवर चाहते फटाके फोडताना दिसत आहे. व्हिडिओत तुम्ही पाहु शकता की, सलमान खानच्या एन्ट्रीचा सीन स्क्रीनवर दिसत आहे. जो पाहिल्यानंतर चाहते थिएटरच्या आत फटाके फोडत आहेत.यामुळे थिएटरमध्ये फटाक्याचा धुर पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे अनेकांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचाही प्रयत्न केला आहे. दरम्यान या व्हिडिओवर आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
Salman Khan Fans bursted fire crackers inside the cinema hall in Malegaon which caused stampede like situation.
— Rishi Bagree (@rishibagree) November 13, 2023
हे वाचलं का?
सलमान खान काय म्हणाला?
सलमान खानला ही घटना कळताच त्याने एक्स या सोशल माध्यमावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी टायगर 3 सिनेमा चालू असताना थिएटरमध्ये फटाके फोडल्याचे ऐकले आहे, हे खुप भयानक आहे, असे सलमान खान म्हणतोय. तसेच स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात न घालता चित्रपटाचा आनंद घ्या आणि सुरक्षित राहा, असे आवाहन सलमान खानने चाहत्यांना केले आहे. आता त्याच्या या आवाहनानंतरही चाहते शांत बसतात का हे पाहावे लागणार आहे.
I’m hearing about fireworks inside theaters during Tiger3. This is dangerous. Let’s enjoy the film without putting ourselves and others at risk. Stay safe.
— Salman Khan (@BeingSalmanKhan) November 13, 2023
ADVERTISEMENT
दरम्यान अभिनेता सलमान खानचा टायगर हा सिनेमा रविवारी 12 नोव्हेंबरला म्हणजेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी रिलीज झाला होता. या सिनेमात सलमान खानसोबत कतरीना कैफ आणि इम्रान हाश्मी देखील आहेत. या सिनेमाने आतापर्यंत दोनच दिवसात 97 कोटी कमावले आहेत. अद्याप आजचा पुर्ण आकडा येणे बाकी आहे. पण या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT