रश्मिका सोबतच्या एंगेजमेंटच्या चर्चेवर विजय देवरकोंडाने सोडलं मौन, लग्नाबद्दल म्हणाला..
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा 2’ मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सध्या ती तिच्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
ADVERTISEMENT
Vijay Deverkonda rashmika mandanna Engagement : प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या नात्याची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते. अलीकडे त्यांच्या लग्नाची आणि एंगेजमेंटची चर्चा सुरू आहे. विजय आणि रश्मिका यावर्षी फेब्रुवारी महिन्यात म्हणजेच 2024 मध्ये एंगेजमेंट करू शकतात, असे बोलले जात आहे. या चर्चांवर आता दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाने मौन सोडलं आहे. तो नेमकं या चर्चांवर काय म्हणाला आहे? हे जाणून घेऊयात. (vijay deverkonda broke his silence rashmika mandanna engagement and marriage rumour)
ADVERTISEMENT
नुकतीच विजय देवरकोंडाने लाईफस्टाईल एशियाशी खास बातचीत केली होती. या चर्चेत विजय देवरकोंडाने त्याच्या एंगेजमेंट आणि लग्नाच्या चर्चेवर भाष्य केले आहे. विजय म्हणाला की, ना मी एंगेजमेंट करतोय, ना लग्न करतोय. माझं एंगेजमेंट आणि लग्न नाही होत आहे. पण प्रसिद्धी माध्यमांना दर दोन वर्षांनी माझं लग्न करायचं आहे, असं त्यांना वाटतं. दरवर्षी अशा अफवा पसरतात. मला असे वाटते की मीडिया मला पकडण्यासाठी आणि माझ्या लग्नाची वाट पाहण्यासाठी बाहेर पडतो.
हे ही वाचा : Ram Mandir : अशोक चव्हाण यांच्या मनात काय? नांदेडमध्ये झळकले राम प्रतिष्ठा बॅनर्स
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा लिव्ह-इन असल्याचा दावा केला जात होता. एका सूत्राच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, या वृत्तांमध्ये कोणतेही तथ्य नाही आणि ते दोघेही त्यांचे नाते अधिकृत करू इच्छित नाहीत. सध्या ते एकमेकांना समजून घेत आहेत. सध्या त्याचा लग्नाचा किंवा एंगेजमेंटचा कोणताही विचार नाही. दोन्ही स्टार्सना त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे.
हे वाचलं का?
वर्कफ्रंट
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा 2’ मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सध्या ती तिच्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याआधी ती रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. त्यांचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘पुष्पा 2’ 15ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तिच्याकडे ‘रॅम्बो’ आणि ‘द गर्लफ्रेंड’ सारखे चित्रपट आहेत.
हे ही वाचा : “यात उद्धवजींचा काही दोष नाही”, चित्रा वाघ यांनी राऊतांकडे मागितला पुरावा
विजय देवरकोंडा यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तो ‘फॅमिली स्टार’मध्ये दिसणार आहे. तो शेवटचा ‘खुशी’ चित्रपटात सामंथा रुथ प्रभूसोबत दिसला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT