स्टार प्रवाहवरील तुझ्या इश्काचा नादखुळा मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता संजय नार्वेकर यांची होणार धडाकेबाज एण्ट्री

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्टार प्रवाहवरील ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. लवकरच मालिकेत इन्सपेक्टर गौतम साळवी यांच्या रुपात सुप्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर यांची एण्ट्री होणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर ते मालिका विश्वात पदार्पण करणार आहेत.तुझ्या इश्काचा नादखुळा मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना संजय नार्वेकर म्हणाले, ‘नाटक आणि सिनेमामध्ये प्रेक्षकांनी मला पाहिलं आहे. मालिकेसाठी बराच वेळ द्यावा लागतो. सिनेमा आणि नाटक सुरु असल्यामुळे मला तो वेळ मालिकेसाठी देता आला नाही. मात्र आता सुवर्णयोग जुळून आलाय. व्यक्तिरेखा खूप छान आहे आणि वेळेचं गणितही जमून आलं आहे.

ADVERTISEMENT

कोणतंही पात्र साकारताना त्याला वेळ आणि योग्य न्याय देता आला पाहिजे असं मला वाटतं. इन्सपेक्टर गौतम साळवी हा एक डॅशिंग, जबाबदार आणि प्रामाणिक पोलिस अधिकारी आहे. पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्याची जबर चर्चा आहे. मिश्किल आणि जिंदादील स्वभावाचा असा हा प्रामाणिक पोलिस अधिकारी. प्रत्येक गोष्टीचा ते बारकाईने आणि खोलात जाऊन अभ्यास करतात. पंचतंत्राच्या गोष्टींचा दाखला देत ते बोलतात. कितीही गंभीर केस असली तरी गौतमच्या सहवासात त्यांचं ओझं जाणवत नाही. माझ्या पद्धतीने मी या पात्रात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न करतो आहे अशी भावना संजय नार्वेकर यांनी व्यक्त केली.’गौतम साळवीच्या येण्याने मालिकेत नेमका काय धमाका होतो याची गोष्ट पुढच्या भागांमधून उलगडेलच. पण स्वाती आणि रघूचं आयुष्य नव्या वळणावर येणार हे मात्र नक्की

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT