Sunny Deol ला ‘गदर-2’ का बनवायचा नव्हता? बॉर्डर लव्ह स्टोरीवरही स्पष्टच बोलला…
बॉलिवूड अभिनेता आणि राजकारणी सनी देओल त्याच्या आगामी ‘गदर 2’ चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अनिल शर्मा यांनी चित्रपटाचं निर्देशन केलं आहे.
ADVERTISEMENT

Gadar 2 : बॉलिवूड अभिनेता आणि राजकारणी सनी देओल त्याच्या आगामी ‘गदर 2’ चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अनिल शर्मा यांनी चित्रपटाचं निर्देशन केलं आहे. पहिल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ प्रमाणे हा चित्रपट यशस्वी आणि ब्लॉकबस्टर ठरेल अशी सर्वांनाच अपेक्षा आहे. (Why Sunny Deol didn’t want to make Gadar 2?)
सनी देओल ‘गदर 2’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान, एका मुलाखतीत, अभिनेता सनी देओल वडील धर्मेंद्र, भाऊ बॉबी देओल आणि दोन्ही मुलं (करण आणि राजवीर) यांच्यासह त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर बॉलिवूडच्या समस्यांवर मन मोकळेपणाने बोलला.
‘हीच जागा योग्य होती, पण…’; अमित शाहांचं विधान ऐकून अजित पवारांनी जोडले हात
सनी देओलला ‘गदर 2’ का बनवायचा नव्हता?
सनी म्हणाला, ‘मला ‘गदर 2′ बनवायचा नव्हता. पण कथा लिहिली होती. चित्रपट बनला. 22 वर्षांनंतर हा चित्रपट येत आहे. कुटुंबासोबत पाहता येणारा हा चित्रपट आहे. माझ्यासाठी तारा सिंग एक अशी व्यक्तिरेखा आहे जी प्रत्येक माणसाला बघायची आहे. सकीनाचे पात्र असे आहे की तिचे तिच्या पतीवर प्रेम आहे. तसंच, यात दोन पात्र आहेत, एक पाकिस्तानची आणि दुसरी भारताची. सगळ्या गोष्टी जोडून हा चित्रपट सांगतो की कुटुंब एकच आहे.’
‘मी ज्या प्रकारे अॅडव्हान्स बुकिंगबद्दल ऐकत आहे, त्यावरून असं वाटतं की हा चित्रपट हिट होणार आहे. लोक थिएटरमध्ये जाणार आहेत. चित्रपट एन्जॉय करणार आहेत. माझ्या मते, हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला तर लोकांना अॅक्शन आणि स्टोरीही पाहायला मिळेल. त्यांचे पूर्ण मनोरंजन होईल.’ असं सनी म्हणाला.










