राघव चढ्ढा सोबत कधी लग्न करणार? पापाराजीच्या प्रश्नावर परिणीती चोपडा म्हणते…

मुंबई तक

ADVERTISEMENT

when will you marry raghav chadha parineeti chopra react on papararaji question
when will you marry raghav chadha parineeti chopra react on papararaji question
social share
google news

Parineeti Chopra Raghav chadha Wedding Date : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोपडा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा (Raghav chadha) यांचा 13 मे 2023 रोजी दिल्लीत साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याला बॉलिवुड कलाकारांपासून राजकीय नेते उपस्थित होते. या साखरपुड्यानंतर आता नेमके दोघे नेमके कधी लग्नबंधनात अडकणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे.यावर आता प्रथमच परिणीती चोप्राने पापाराजीला प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत ती काय म्हणाली आहे, हे जाणून घेऊयात.(when will you marry raghav chadha parineeti chopra react on papararaji question)

परिणीती चोपडाला (Parineeti Chopra) मंगळवारी पापाराजीने मुंबईच्या घरी स्पॉट केले होते. यावेळेस परिणीती चोप्रा व्हाईट कॉटन सुटमध्ये दिसली होती. यावेळेस पापाराजीने परिणीतीला तिच्या लग्नाच्या तारखेविषय़ी विचारणा केली होती. यावेळेस परिणीती चोप्राने स्मितहास्य देत प्रश्नाला उत्तर न देता मौन बाळगले होते.

हे ही वाचा  :  Manvi Raj Singh : रांची ते मुंबई आणि लव्ह जिहाद, मानवीसोबत तनवीरने काय केलं?

पापाराजीने परिणीतीला (Parineeti Chopra) प्रश्न केला की, तुम्ही लग्न कधी करणार आहात? या प्रश्नावर परिणीती चोपडा शांत राहली आणि ड्राय़व्हरला गाडी पुढे घ्यायला सांगू लागली. यानंतर पुन्हा एकदा पापाराजीने तिला सवाल केला. अरे परी, प्लीज लग्नाची तारीख सांग? असे लपवू नकोस, यावर परिणीती चोप्राने स्मितहास्य देत ईशाला विचारा असे उत्तर दिले. परिणीतीने इतकंच उत्तर दिले आणि तिने पळ काढला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

परिणीती चोपडाचा (Parineeti Chopra) नुकताच दिल्लीत साखरपुडा पार पडला.या साखरपुड्याचे अनेक फोटो समोर आले होते.या साखरपुड्यात परिणीत भावुक झाली होती. आणि ही वेळ माझ्यासाठी खुप खास असल्याचे त्याने म्हटले होते. राघव चढ्ढा आणि परिणीती चोपडा नुकतेच राजस्थानला पोहोचले होते. अशीही चर्चा आहे की दोघेही ड़ेस्टीनेशन वेडिंग करणार आहेत.प्रियांका चोपडा प्रमाणे परिणीती चोपडाही उदयपुरमध्ये लग्न करणार आहेत.

राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि परिणीती चोप्रा (Parineeti chopra)बद्दल बोलायचं झालं तर दोघांनीही ब्रिटेनमध्ये शिक्षण घेतले आहे. ब्रिटनमधलं शिक्षण पुर्ण झाल्यानंतर परिणीती चोप्राने बॉलिवूडमध्ये करिअर केलं.ती आता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. तर राघव चढ्ढा यांनी राजकारणाला करिअर म्हणून निवडलं. राघव आम आदमी पक्षाचे खासदार आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा  :  सुनील शेट्टीला यायचे अंडरवर्ल्डचे फोन; म्हणाला, ‘मी त्यांना उत्तरे द्यायचो, तेव्हा पोलीस…’

    follow whatsapp

    ADVERTISEMENT