क्रांती रेडकरने का रद्द केली पत्रकार परिषद?, बहिणीच्या ड्रग्स केसबाबत नेमकं म्हणणं काय?
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी (8 नोव्हेंबर) सकाळीच एक खळबळजनक ट्विट शेअर करुन पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला होता. समीर वानखेडे यांची मेहुणी ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेली आहे का? असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला होता. दरम्यान, मलिकांनी हे ट्विट शेअर केल्यानंतर समीर वानखेडे यांच्या पत्नी […]
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी (8 नोव्हेंबर) सकाळीच एक खळबळजनक ट्विट शेअर करुन पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला होता. समीर वानखेडे यांची मेहुणी ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेली आहे का? असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला होता. दरम्यान, मलिकांनी हे ट्विट शेअर केल्यानंतर समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर ही पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता क्रांतीने पत्रकार परिषद रद्द केली आहे.
एकीकडे मलिकांनी अत्यंत गंभीर सवाल उपस्थितीत केलेले असताना क्रांती रेडकर यांनी आयोजित पत्रकार परिषद का रद्द केली असा सवाल विचारला जात. दरम्यान, परिषद रद्द करताना क्रांती रेडकरच्या वतीने असं कळविण्यात आलं आहे की, संबंधित प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असल्याने तूर्तास याबाबत आपण काहीही बोलणार नाही.
पाहा पत्रकार परिषद रद्द करताना क्रांती रेडकर नेमकं काय म्हणाली
‘त्या’ ड्रग्स प्रकरणात माझी बहीण तर पीडित..