तुम्हाला आजारी असल्यासारखं वाटतंय? पण तो आजार नाही; तर…

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Deficiency Of Vitamin : निरोगी राहण्यासाठी शरीराला विविध प्रकारच्या पोषणाची गरज असते. जसे कॅल्शियम, खनिज, जीवनसत्त्व इत्यादी. आज आपण अशा जीवनसत्वाबद्दल जाणून घेऊयात जे आपल्याला आपल्या आहारातून मिळतात. यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात पोषकतत्वही मिळतात. (Feeling sick But not sickness There may be a deficiency of vitamin B-1 in the body)

व्हिटॅमिन बी 1 लाच थायमिन असंही म्हणतात. हे आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचं आहे याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आपल्याला अशी काही लक्षणं दिसत असतील, ज्यामुळे आजारी असल्यासारखं सतत वाटत राहतं. असं वाटतं पण तसं नसतं, आपण आजारी नसतो. केवळ जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे थकवा येतो.

Sharad Pawar Nawab malik : पवारांचा मलिकांना फोन, काय झालं बोलणं?

काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार, व्हिटॅमिन बी-1 (थायमिन) शरीरासाठी का आवश्यक आहे, त्याच्या कमतरतेचे काय तोटे आहेत आणि कोणत्या खाद्यपदार्थांमध्ये ते आढळते याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

थायमिन म्हणजे काय?

तुम्हाला माहिती नसेल पण थायामिन म्हणजेच व्हिटॅमिन बी-1 आहे. हे शरीरासाठी एक अतिशय महत्वाचं जीवनसत्व आहे. ते पाण्यात विरघळतं. रोजच्या आहारातून शरीराला व्हिटॅमिन बी-1 मिळते. याशिवाय व्हिटॅमिन बी-1 ची कमतरता सप्लिमेंट्स आणि औषधांनीही पूर्ण करता येते.

Nitin Desai : नितीन देसाईंच्या एनडी स्टुडिओबाबत सरकार मोठा निर्णय घेणार,काय म्हणाले उदय सामंत?

व्हिटॅमिन बी-1 शरीरासाठी महत्वाचे का आहे?

  • थायमिन (व्हिटॅमिन बी-1) माइक्रोन्यूट्रिएंट्सचे ऊर्जेत रूपांतर करते.
  • ही ऊर्जा शरीरासाठी खूप महत्त्वाची असते. विशेषतः मेंदूच्या आरोग्यासाठी आणि मज्जासंस्थेसाठी.
  • यामुळे मेंदूची क्रिया सुरळीत राहते.
  • थायमिन स्नायूंच्या वहनासाठी मदत करते.
  • मज्जातंतूतून जाणाऱ्या सिग्नललाही मदत होते. ही संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी व्हिटॅमिन बी-१ (थायमिन) उपयुक्त आहे.
  • व्हिटॅमिन बी-१ हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

व्हिटॅमिन बी-1 च्या कमतरतेचा परिणाम काय?

  • थायमिनच्या कमतरतेमुळे दिवसभर थकवा येतो.
  • चिडचिड वाटणे, वजन कमी होणे.
  • प्रतिकारशक्ती कमकुवत होते.
  • स्नायूंमध्ये अशक्तपणा येतो.
  • पोटात त्रास होतो, भूक लागत नाही.
  • नीट झोप येत नाही

Sharad Pawar: अजितदादांनी पवारांची साथ सोडली, पण ‘या’ दोन तरुणांनी थोपटले दंड

व्हिटॅमिन बी-1 कशापासून मिळते?

  • व्हिटॅमिन बी-1 मासे आणि मांसामधून मिळते.
  • बीन्स, मसूर, सूर्यफुलाच्या बिया, वाटाणे, मशरूम, पालक हे शाकाहारींसाठी चांगले पर्याय आहेत.
  • आपल्या आहारात व्हिटॅमिन बी-1 चे प्रमाण योग्य प्रमाणात असावे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT