Heart Attack : हृदयविकाराचा झटका का येतो? नेमकी त्याची लक्षणं काय? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
सध्याच्या काळात हार्ट अटॅक येण्याच प्रमाण वाढले असले तरी ते फक्त वृद्ध आणि ज्येष्ठ लोकांमध्येच आहे असं नाही. तर हृदयविकाराचा झटका तरुण वयातील मुलांनाही येऊ लागला आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी लोकांना सल्ला दिला आहे.
ADVERTISEMENT

Heart Attack : अनेकदा असं समजलं जातं की, हृदयविकाराचा झटका फक्त वृद्ध (old man) लोकांनाच येतो किंवा पूर्वी फक्त वृद्ध लोकांनाच हृदयविकाराचा त्रास होत होता. वाढत्या वयामुळे आणि वृद्ध झाल्यामुळे तो त्रास होणार असं मानलं जायचं. मात्र गेल्या काही दिवसांपासून तरुणांमध्येही हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. हृदयविकाराच्या झटक्याने जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. भारतातही मोठ्या प्रमाणात लोक हृदयविकारामुळे त्रस्त आहेत. गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढला आहे.
लहान वयातच येतो झटका
फिरत असताना, बसलेले असताना तरुण हृदयविकाराचे बळी ठरत आहेत. अगदी तरुण वयात हृदयविकाराच्या झटका येत असल्याने लोक चिंताग्रस्त आहेत. हृदयविकाराचा झटका आल्याने अनेक युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अगदी तरुण वयात हृदयविकाराचा त्रास वाढत असल्यामुळेच लहान वयात हृदयविकाराचा झटका कशामुळे येतो, तो आजार कसा टाळता येईल याचा विचार आता होऊ लागला आहे. त्याबाबतच क्रॅनिओफेशियल सर्जन डॉ. अनुज कुमार यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
हार्ट अटॅक म्हणजे नेमकं काय
मेडिकलच्या भाषेत हृदयविकाराच्या झटक्याला मायोकार्डियल इन्फेक्शन असंही म्हणतात. ‘मायो’ या शब्दाचा अर्थ स्नायू असा होतो तर ‘कार्डियल’ हा हृदयाशी संबंधित आहे. तर दुसरीकडे, ‘इन्फार्क्शन’ म्हणजे अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे त्याचा त्रास होतो. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना दीर्घकालीन नुकसानही होऊ शकतो. हृदयविकाराचा झटका ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणारी धमनीच्या ब्लॉकेजमुळे अचानक रक्तपुरवठा त्यामुळे हृदयाच्या स्नायूंच्या पेशी मरून जातात.
हे ही वाचा >> Mia Khalifa: पॉर्न स्टार ‘मिया’च्या Hot कॅलेंडरची ‘हॉट’ चर्चा, पण तिच्यासोबत घडलं भलतंच
उच्च रक्तदाब
हृदयविकाराचा झटका येण्यापाठीमागे महत्वाचे कारण आहे ते म्हणजे उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाबामुळेच हृदयाच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालेला असतो. त्याच्यामुळे रक्तवाहिन्यांचेही नुकसान होते. त्यामुळे रक्तवाहिन्यांचीही लवचिकता कमी होते. रक्तप्रवाह वाढल्यानंतर ऑक्सिजन आणि रक्त हृदयापर्यंत प्रचंड वेगाने पोहचत असते. जर ही परिस्थिती तुमच्या शरीरात निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो, आणि अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका निर्माण होतो.