India-Bharat : 74 वर्षांपूर्वी कसं ठरलं देशाचे नाव? आंबेडकरांची भूमिका ठरली महत्त्वाची
How decided india name bharat : इंडिया म्हणजे भारत असे वाक्य संविधानात आहे. इंडियाला भारत हे नाव देण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका महत्त्वाची होती. संविधान सभेत काय झाली होती चर्चा.
ADVERTISEMENT

How gave Bharat name to India : 18 सप्टेंबर 1949 म्हणजे 74 वर्षांपूर्वी देशातील अत्यंत अभ्यासू नेत्यांनी देशाला ‘इंडिया’ म्हणावे की ‘भारत’ की, आणखी काही यावर चर्चा केली. मात्र सात दशकांनंतरही हा वाद सुरूच आहे. त्यामुळे इंडियाला भारत म्हणून नावं कसं देण्यात आलं हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. यात एक गोष्ट सांगायची म्हणजे भारत नाव ठरवण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका महत्त्वाची राहिली होती. ती कशी हेच समजून घेऊयात…
स्वतंत्र भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी संविधान सभेची स्थापना करण्याची मागणी केली गेली होती. ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख मागण्यांपैकी एक होती. ब्रिटीश सरकारने भारताकडे सत्ता सोपवण्यासाठी कॅबिनेट मिशन पाठवले, तेव्हा 1946 मध्ये प्रथमच संविधान सभेची स्थापना करण्यात आली.
9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली. त्यानंतर दोन वर्षे 11 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर संविधान सभेने भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला. 166 दिवसांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर हा मसुदा तयार करण्यात आला.
संविधान सभेची पहिली बैठक डिसेंबर 1946 मध्ये झाली असली, तरी 18 सप्टेंबर 1949 रोजीच सभेला देशाचे नाव निश्चित करण्यात यश आले. पण नामकरणाची ही प्रक्रिया तितकी सोपी नव्हती.