ISRO मध्ये नोकरी कशी मिळवायची? पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या..

रोहिणी ठोंबरे

जर तुम्हाला ISRO मध्ये नोकरी मिळवायची असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला 12वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करावी लागेल, त्यानंतर ISRO मध्ये शास्त्रज्ञ पदासाठी उमेदवारांना सिव्हिल इलेक्ट्रिकल, आर्किटेक्चर, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स यांसारख्या क्षेत्रात पदवी प्राप्त करावी लागेल.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Indian Space Research Organisation : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) नोकरी कशी मिळवायची, इस्रोमध्ये कसं जायचं किंवा इस्रोमध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल, जर तुम्हाला देखील यासंबंधित माहिती मिळवायची असेल आणि त्याबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप खास आहे. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. (How to get job in ISRO)

ISRO मध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल?

जर तुम्हाला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) नोकरी करायची असेल तर प्रथम सिव्हिल, इलेक्ट्रिकल आर्किटेक्चर, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स आणि रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग या क्षेत्रातून पदवीधर असणं गरजेचं आहे.

One Nation One Election वरून संजय राऊत संतापले; मोदींना म्हणाले, ‘फुगा…’

अर्ज केल्यानंतर, तुम्हाला इस्रोमध्ये नोकरी मिळविण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, तुमची मुलाखत घेतली जाईल आणि मुलाखत उत्तीर्ण झाल्यानंतर, तम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला नोकरी मिळेल.

इस्रोमध्ये नोकरीसाठी पात्रता

जर तुम्हाला ISRO मध्ये नोकरी मिळवायची असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला 12वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करावी लागेल, त्यानंतर ISRO मध्ये शास्त्रज्ञ पदासाठी उमेदवारांना सिव्हिल इलेक्ट्रिकल, आर्किटेक्चर, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स यांसारख्या क्षेत्रात पदवी प्राप्त करावी लागेल. पदवीधरांची किमान 65% गुणांसह प्रथम श्रेणी BE/B.Tech पदवी असणे आवश्यक आहे. तसंच BE/B.Tech नंतर डिप्लोमा केलेले विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. ISRO भरतीसाठी केंद्रीकृत बोर्डाद्वारे परीक्षा घेतली जाते , ती पास करणं आवश्यक आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp