ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! टेन्शन घेऊच नका, 'या' तारखेला मिळतील चौथ्या-पाचव्या हफ्त्याचे पैसे

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana scheme women will get benefit of third installement mukhymantri ladki bahin yojana scheme eknath shinde aditi tatkare ajit pawar
तिसरा हप्ता खात्यात येण्यापूर्वी 'या' गोष्टी करा,
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी अपडेट वाचली का?

point

चौथ्या आणि पाचव्या हफ्त्याचै पैसे खात्यात कधी होणार जमा?

point

उपमुख्यमंत्री अजित पवारांंचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान

Ladki Bahin Yojana 4th And 5th Installment : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना सुरु केल्या जातात. अशाचप्रकारे भारताच्या वेगवेगळ्या राज्यांची सरकारेही आपल्या नागरिकांसाठी विविध योजना सुरु करतात. महाराष्ट्र सरकारने यावर्षी राज्यातील महिलांसाठी एक मोठी स्कीम सुरु केली आहे. त्या योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना. (Many schemes are launched by the central government for the citizens of the country. Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Is One Of Them)

याच माध्यमातून सरकार राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देत आहेत. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत तीन हफ्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता लाभार्थी महिलांना या योजनेच्या चौथ्या हफ्त्याच्या रक्कमेची प्रतिक्षा लागली आहे. या योजनेच्या चौथ्या हफ्त्याचे पैसे नक्की कधी मिळतील? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

'या' दिवशी खात्यात जमा होणार योजनेची रक्कम?

राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा पुढच्या हफ्त्याच्या रक्कमेबाबत मोठं विधान केलं आहे. अजित पवार म्हणाले, माझी लाडकी बहीण योजनेचा चौथा आणि पाचव्या हफ्त्याची रक्कम एकत्रित दिली जाईल. ही रक्कम 10 ऑक्टोबरआधी महिलांच्या खात्यात जमा केली जाईल. महिलांना दिवाळी आणि भाऊबीजेची ओवाळणी म्हणून सरकारकडून दोन्ही हफ्त्यांचै पैसे देण्यात येतील. राज्यातील एकूण 2.5 कोटींहून अधिक महिलांना या हफ्त्यांच्या पैशांचा लाभ मिळणार आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>हरियाणाच्या विधानसभेत फुललं BJP चं कमळ! महाराष्ट्राच्या राजकारणावर काय होणार परिणाम?

आधार कार्डला खात्याशी लिंक करा

राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी आधार कार्डला खात्याशी लिंक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या महिलांच्या खात्यात आधार कार्ड लिंक नसेल, तर त्या महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार नाही. यासाठी तुम्ही लवकरात लवकर आधार कार्ड लिंक करणे महत्त्वाचे आहे. 

हे ही वाचा >>  "मी उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं..."; 'Bigg Boss'च्या घरात गुणरत्न सदावर्तेंनी सांगितली A टू Z स्टोरी

विधानसभा निवडणूक येऊ घातली असतानाच महिलांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. माझी लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्यातील हफ्त्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात दिले जातील, असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भाऊबीजेच्या ओवाळणीचे पैसे महिलांच्या खात्यावर लवकरच जमा होतील, असं कळते आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT