Horoscope In Marathi: धनत्रयोदशीला मिळणार पैसाच पैसा! पण कोणत्या राशीच्या व्यक्तींना? वाचा आजचं राशी भविष्य
29 October 2024 Horoscope : वैदिक शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं जातं. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह-नक्षत्रांच्या स्थतीनुसार राशी भविष्य लिहिलं जातं. 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कोणत्या राशी होतील गडगंज श्रीमंत?

या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

धनत्रयोदशीला या लोकांचं नशीबच चमकेल
29 October 2024 Horoscope : वैदिक शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं जातं. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह-नक्षत्रांच्या स्थतीनुसार राशी भविष्य लिहिलं जातं. 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशीपासून दिवाळीच्या उत्सवाला सुरुवात केली जाते. यादिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं जातं. ज्योतिष गणनेनुसार, 29 ऑक्टोबरचा दिवस काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. कर काही राशीच्या लोकांच्या जीवनात छोट्या-मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो.
मेष राशी
रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीत प्रगती होईल. संवाध साधताना काळजी घ्या. मुलांकडून आनंदाजी बातमी मिळू शकते. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. घर-कुटुंबात धार्मिक कार्य होतील. कौटुंबिक समस्यांमुळे त्रस्त व्हाल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.
वृषभ राशी
तुमचा आत्मविश्वास वाढेल. पण मन अशांत राहील. आळशी होऊ शकता. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत प्रगती होईल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. खर्चात वाढ होईल. प्रवासाचा योग बनेल. मित्रांचं सहकार्य मिळेल.
मिथुन राशी
नोकरी-धंद्यात यश मिळेल. मेहनत अधिक घ्यावी लागेल. नोकरीसाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. नवीन वाहन खरेदी करू शकता. मित्रांचं सहकार्य मिळेल.