Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! '...तरच मिळतील 4500 किंवा 1500 रुपये?' सरकारचा नियम एकदा वाचाच
Mukhyamantri Mazi ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून २ कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
...तरच मिळतील लाडकी बहीण योजनेचे 4500 किंवा 1500 रुपये
लाडक्या बहिणींनो! सरकारचा नियम माहितीय का?
मंत्री आदिती तटकरेंनी दिली होती महत्त्वाची माहिती
Mukhyamantri Mazi ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून २ कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. तसच महिलांना तिसऱ्या हफ्त्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिनांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा केले जात आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे काल 29 सप्टेंबरला जमा होणार असल्याचं महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं होतं. त्यानुसार तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा होत आहेत. काही पात्र महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा होत आहेत. तर काही महिलांना फक्त 1500 रुपयेच मिळत आहेत. परंतु, काही महिलांचा पैशांबाबत गोंधळ उडाला आहे. बँक खात्यात वेगवेगळी रक्कम जमा होत असल्याचं समोर येत आहे. सरकारचा नियम काय आहे? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. (The government is informed that through Chief Minister Ladki Bahin Yojana, money was deposited in the accounts of more than 2 crore women in the first and second Installment)
ADVERTISEMENT
महाराष्ट्र सरकारचा नियम काय आहे?
मीडिया रिपोर्टनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जुलै 2024 पासून महिलांना पैसे दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत अनेक महिलांना लाभ मिळाला आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलं होतं, त्यांना जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार आहे.
हे ही वाचा >> Maharashtra Weather: काहीसा ब्रेक तर, कुठे सुरूच... 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार! पाहा पावसाचे अपडेट
ऑगस्ट महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना एकूण तीन हजार रुपये दिले गेले. पण सरकारच्या नवीन नियमांनुसार, 1 सप्टेंबरपासून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना सप्टेंबर महिन्यातच लाभ मिळेल. ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे, त्यांना जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्याचे 3000 रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना फक्त 1500 रुपये दिले जातील.
हे वाचलं का?
कोणत्या महिलांना मिळणार 4500 रुपये?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक महिलांना 3000 रुपये मिळाले आहेत. 1 सप्टेंबरच्या आधी अर्ज करूनही अनेक महिलांच्या खात्यात पैसै जमा झाले नाहीत. अर्ज मंजूर झाल्यानंतरही या महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाहीय. आधार नंबर बँक खात्याशी लिंक न झाल्याने किंवा अर्जात अन्य त्रुटी असल्याने महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाही. पण ज्या महिला यासाठी पात्र ठरल्या आहेत, त्यांना योजनेचे पैसे मिळतील.
हे ही वाचा >> Maharashtra Breaking News : पश्चिम रेल्वेवर आज चार तासांचा मेगाब्लॉक; अनेक लोकल सेवा रद्द
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT