माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीचा GR पाहिलात का?, नेमका खर्च...
Mazi Ladaki Bahin Yojana GR: माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातासाठी सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. पाहा त्याच्या GR मध्ये नेमका किती खर्चाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
माझी लाडकी बहीण योजना प्रचंड चर्चेत
माझी लाडकी बहीण योजना सरकारला ठरणार फायदेशीर?
माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर किती खर्च?
Mazi Ladaki Bahin Yojana: मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केल्याच्या दिवसापासूनच ही योजना राज्यात प्रचंड चर्चेत आली आहे. कारण या योजनेद्वारे राज्यातील महिलांना दरमहा सरकार 1500 रुपये देणार आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्यात आलेली योजना ही सरकारसाठी गेमचेंजर ठरू शकते असा शिंदे सरकारचा कयास आहे. याच योजनेची अत्यंत झटपट अंमलबजावणी देखील करण्यात आली आहे. (have you seen gr of advertisement of mazi ladaki bahin yojana know how much shinde government will spend)
याशिवाय ही योजना जनतेपर्यंत पोहचली पाहिजे यासाठी सरकार हे अतिशय दक्ष आहे. त्यामुळेच या योजनेच्या जाहिरातीवर देखील सरकारने बराच खर्च केला आहे.
हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana: बँकेत खातं नसेल तरी मिळतील 1500 रुपये, फक्त...
शासनाच्या वतीने जो शासन निर्णय (GR)जारी करण्यात आला आहे त्यामध्ये या योजनेच्या जाहिरातीवर सरकार किती खर्च करेल याचा तपशीलच देण्यात आला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
जीआरमध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे सरकार या योजनेच्या जाहिरातींसाठी तब्बल 4 कोटी 92 लाख रुपये खर्च करणार आहे.
पाहा माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरात खर्चाचा GR जसाच्या तसा..
शासन निर्णय :-
“मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण" या योजनेकरीता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फ़त राबविण्यात येणा-या खालीलप्रमाणे माध्यम आराखड्यास ( Media Plan) व त्याकरिता होणा-या रुपये ४,९२,१८,०००/- (अक्षरी रुपये चार कोटी ब्याण्णव लक्ष अठरा हजार फक्त) इतक्या खर्चास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर Media Plan अंतर्गत राबवावयाच्या उपक्रमांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:-
ADVERTISEMENT
1. निर्मिती साहित्य: प्रिंट आणि इतर बाहय माध्यमांकरीता जाहिरातीचा मजकूर व इतर - १,००,०००/- (अंदाजित रक्कम)
ADVERTISEMENT
- TVC - ६० सेकंद (DAVP दराने) - ३५,००,०००/- (अंदाजित रक्कम)
- Audio Jingle (&o Second)- २,२५,०००/- (अंदाजित रक्कम)
- एकूण (अ) ३८,२५,०००/- (अंदाजित रक्कम)
2. दूरदर्शन - टिव्हीसीचे जाहिरात प्रसारण - ७ दिवस: १०,००,०००/- (अंदाजित रक्कम)
3. आकाशवाणी केंद्र - जिंगल्स / स्पॉटचे सकाळी व सायंकाळी ७ वाजताच्या बातम्यांच्या मध्यंतरात जाहिरात प्रसारण - ७ दिवस: २५,००,०००/- (अंदाजित रक्कम)
4. मराठी वृत्तवाहिन्या - ४५ ते ६० सेकंद जाहिरातीचे प्रसारण - ७ दिवस: १,००,००,०००/- (अंदाजित रक्कम)
हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana: 1500 रु. जमा पण झाले, तुम्ही कसली पाहताय वाट? 'असा' भरा अर्ज...
5. एफ एम वाहिन्या - ४५ ते ६० सेकंदाच्या जाहिरातीचे राज्यातील १६ एफएम वाहिन्यांच्या ६० स्टेशनवरुन प्रसारण- ७ दिवस: ७०,००,०००/- (अंदाजित रक्कम)
6. सोशल मीडिया - शा.नि.२३.११.२०२३ मधील संस्थांच्या सुचीमधील संस्थांमार्फत विहीत कार्यपध्दतीचे अवलंब करुन प्रसिध्दी करणे - १५ दिवसछ ५०,००,०००/- (अंदाजित रक्कम)
7. एसटी बस डेपोतील सार्वजनिक उद्घोषणा - राज्यातील ग्रामीण भागातील बसस्थानकावरुन ऑडिओ जिंगलचे प्रसारण - १५ दिवस: ६०,००,०००/- (अंदाजित रक्कम)
8. एसटी डेपोतील LCD/LED/ESB - एसटी बस डेपोतील इलेक्ट्रानिक साईन बोर्ड/ इलईडी स्क्रीनवरुन प्रसिध्दी - १५ दिवस: ६०,००,०००/- (अंदाजित रक्कम)
9. बेस्ट फुल रॅप - बेस्ट बसेसवर जाहिरात - १५ दिवस: ६०,००,०००/- (अंदाजित रक्कम)
एकूण - ४,३५,००,०००/- (अंदाजित रक्कम)
10. प्रशासकीय खर्च - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला येणार कार्यालयीन उपकरणावरील खर्च, सॉफ्टवेअर, तात्पुरता मनुष्यबळावरील खर्च, संशोधन खर्च, वाहतूक खर्च, इतर किरकोळ खर्च - १८,९३,०००/- (अंदाजित रक्कम)
पाहा संपूर्ण जीआर - View PDF
माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरील एकूण सर्व खर्च - ४,९२,१८,०००/- (अंदाजित रक्कम)
- उपरोक्तप्रमाणे माध्यम आराखड्यानुसार जाहिरात प्रसिध्दीची कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महिला व बाल विकास विभागाच्या यंत्रणेच्या समन्वयाने करावी. तसेच, माहिती व जनसंपर्क महासांचालनालयाने सदर जाहिरात प्रसिध्दीची कार्यवाही प्रचलित नियमानुसार व विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून करावी.
- प्रस्तुत जाहिरात प्रसिध्दीबाबतची देयके कक्ष अधिकारी तथा आहरण व संवितरण अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, नवीन प्रशासकीय इमारत, ३ रा मजला, मंत्रालय, मुंबई यांचे नावे दर्शविण्यात यावीत. त्यानुषंगाने आराखडयानुसार त्या त्या माध्यमाद्वारे प्रसिध्दी झाल्याबाबत संबंधित एजन्सीने माहिती (उदा. जिओ टॅग फ़ोटो, टेलिकास्ट सर्टिफ़िकेट, कॉल लॉग्स इ.) सादर करावी. तद्नंतर याबाबत पडताळणी करून देयके अदा करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी.
- प्रस्तुत प्रकरणी येणारा खर्च हा सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्र. एक्स-१, २२३५ सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२ - समाज कल्याण, १०३ - महिला कल्याण, (३३) मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना (३३) (०१) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (कार्यक्रम), २२३५ डी ६३१, ३१ - सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशीर्षाखाली उपलब्ध केलेल्या तरतुदीमधून भागविण्यात येईल.
- सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०७२४१२३०४७५७३० आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
ADVERTISEMENT