History of Mumbai : 'या' सात बेटांनी एकत्र येऊन मुंबईला दिला जन्म! असा आहे इतिहास!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

What is the History of Mumbai? : मुंबई एक असं शहर जे स्वप्नांचं शहर म्हणून ओळखलं जातं. या शहराची निर्मिती कशी झाली? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? या शहराची कहाणी सात बेटांनी सुरू होते ज्याचे नंतर मेट्रो सिटीमध्ये रूपांतर झाले. इतिहास आणि वर्तमान यातील बदललेले स्वरूप आपल्याला आणखी रोमांचकारी अनुभव देऊन जातो. अशा कित्येक रंजक कथा त्या ठिकाणांशी जोडलेल्या असतात. अशीच एक कथा आहे मुंबईच्या निर्मितीची. याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊयात. (History of Mumbai How it Built up by 7 islands Know about it in detail

आजची जी मुंबई मुख्य शहर आहे, तिथे सात छोटी छोटी बेटे वसलेली होती. या सातही बेटाच्या मधल्या भागात म्हणजे खाडीत भराव घालून तिथला समुद्र बुजवण्यात आला आणि अशा पद्धतीने ही सातही बेटे एकमेकांशी जोडून सलगपणे हे शहर वसवण्यात आले. 

मुंबई शहर वसवण्यासाठी जी सात बेटे एकत्र करण्यात आली ती कोणती? 

  • छोटा कुलाबा - हे ठिकाण आजच्या कुलाब्याच्या उत्तरेला होते. हा सर्वात लहान भूभाग होता. याला अल-ओमानी देखील म्हटलं जायचं. कारण इथले मच्छीमार मासेमारी करण्यासाठी ओमानपर्यंत जायचे. 
  • वरळी - वरळी बेटाच्या त्या भागावर आज हाजी अली दर्गा आहे. मुंबई शहराशी या बेटाचं कनेक्शन खूप उशिरा म्हणजे 1748 मध्ये आला.
  • माझगाव - बहुतांश दक्षिण मुंबईत माझगावचा वाटा आहे. 17 व्या शतकाच्या अखेरीस, माझगावने मुंबई शहराचे प्रारंभिक स्वरूप घेतले होते.
  • परळ - परळच्या इतिहासकारांचे म्हणणे आहे की 13व्या शतकात हे बेट राजा भीमदेवाच्या ताब्यात होते. पुढे ते पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले. 1770 मध्ये जेव्हा मुंबईचे गव्हर्नर विल्यम हार्नबी यांनी येथे आपले निवासस्थान केले तेव्हा हे बेट प्रसिद्धीस आले.
  • कुलाबा - कुलाबा म्हणजे कोळी समाजाचे स्थान. कोळींना मच्छीमार म्हणतात. कुलाब्याच्या आधी पोर्तुगीज याला कांदिल बेट असेही म्हणत.
  • माहीम - राजा भीमदेवाच्या राजवटीत ही राजधानी होती. नंतर मुस्लिम शासकांनी ही जागा ताब्यात घेतली. त्यांच्याकडून ते पोर्तुगीजांपर्यंत पोहोचले, त्यांनी ते ब्रिटिशांच्या स्वाधीन केले.
  • बॉम्बे बेट - हे मुंबईचे सर्वात जुने बेट, ज्याचा उल्लेख मौर्यकालीन इतिहासातही आढळतो. बॉम्बे बेट आजच्या डोंगरी ते मलबार हिलपर्यंत पसरलेला आहे.

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

History of Mumbai, History of mumbai wikipedia, History of mumbai timeline, history of mumbai seven islands, mumbai district name, mumbai city name,  mumbai population, mumbai map

सात बेटे एकत्र येऊन मुंबई कशी आली उदयास?

ब्रिटीशांच्या काळात, सुमारे चार ते पाच शतकांपूर्वी जेराल्ड आन्जिअर या मुंबईच्या दुसऱ्या ब्रिटीश गव्हर्नरने या सात बेटांमधील खाड्या बुजवण्याचा आणि समुद्र हटवण्याचा निर्णय घेतला. यानंतर टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प राबवण्यात आला आणि सात बेटे एकत्र करून मुंबई बेटाची निर्मिती करण्यात आली.

एक तर या बेटांमधील अंतर अतिशय कमी होते आणि दुसरी बाब म्हणजे या बेटा दरम्यानचा समुद्र उथळ होता. ओहोटीच्या वेळी तर, तो पूर्ण कोरडाच व्हायचा. अशावेळी एका बेटावरून दुसऱ्या बेटावर लोक चालतच जायचे. कारण उथळ पाण्यात नाव हाकणे देखील शक्य नव्हते. पण, तरीही हा प्रदेश दलदलीचा होता. म्हणून हा प्रवास करताना खूप त्रास व्हायचा. हे बेट एकमेकांशी जोडले गेल्याने एका बेटावरील लोकांना दुसऱ्या बेटावर जाण्यासाठी फारशी दगदग करावी लागली नाही.

ADVERTISEMENT

दुसऱ्यांदा 1772 मध्ये, महालक्ष्मी आणि वरळी यांना जोडण्यासाठी आणि मुंबईला सततच्या येणाऱ्या भरतीच्या पाण्यापासून आणि सतत येणाऱ्या पुरापासून वाचवण्यासाठी समुद्र हटवून ही दोन ठिकाणे जोडण्यात आली.

ADVERTISEMENT

1803 मध्ये सायनपासून सालसेट हा भाग जोडण्यात आला. कुलाबा ते मुंबई या भागाला जोडणारा रस्ता 1838 मध्ये पूर्ण करण्यात आला. माहीम आणि बांद्रा हे दोन भाग 1845 मध्ये जोडण्यात आले. या सगळ्या प्रकल्पासाठी त्यावेळी 1,57,000 रुपये इतका खर्च आला होता. सरकारने हे काम बेकायदेशीर ठरवून नामंजूर केल्याने पहिले बॅरोनेट सर जमशेदजी जीजीभोय यांच्या पत्नी लेडी अवाबाई जमशेदजी जीजीभोय यांनी ही सगळी रक्कम दान दिली होती. सातही बेटे एकमेकांना जोडण्यासाठी सुमारे दीडशे वर्षांचा कालावधी लागला. पण, त्यामुळे मुंबई हे एक विस्तृत व्यापारी बंदर म्हणून उदयास आले.

बॉम्बेची कशी झाली मुंबई?

पोर्तुगीज लोक जेव्हा येथे आले तेव्हा त्यांनी या शहराला अनेक नावांनी हाक मारली. यावेळी त्यांनी बॉम्बे हे नाव लिखित स्वरूपात घेतले. 17 व्या शतकात ब्रिटिशांनी या जागेवर ताबा मिळवल्यानंतर, याला पूर्वीच्या नावाने संबोधले गेले, जे बॉम्बे झाले. पण मराठी लोक याला मुंबई म्हणायचे. तर हिंदी भाषिक लोक या शहराला बॉम्बे म्हणत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबा देवीवरून मुंबई असं नाव पडलं हे पूर्वीपासून सांगितलं जातं.
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT