INDIA@ 100: Metaverse.. भारतासाठी महासत्तेचा पासवर्ड!
INDIA@ 100: मेटावर्स हे भविष्यातील एक असं तंत्रज्ञान आहे की, आजवरच्या तंत्रज्ञानाच्या सगळ्या भौतिक व्याख्याच बदलून टाकेल. जे भारतासाठी महासत्ता होण्याची किल्ली ठरू शकते. याचाच ‘इंडिया अॅट 100’ या ‘इंडिया टुडे’च्या मासिकात विशेष आढावा घेण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

INDIA@ 100: राज चेंगप्पा: Metaverse हे एक नाव, एक विचार आहे. जोवर मार्क झुकरबर्गने (Mark Zuckerberg) त्याच्या विशाल डिजिटल साम्राज्याचे नवीन नाव ठेवले नव्हते तोवर हा विचार फक्त कहाणी आणि सायबर संस्कृती यांच्या कल्पनेतच होता.हे नामकरण एकमेकांशी जोडलेल्या डिजिटल विश्वांच्या सतत वाढत जाणाऱ्या महाजालाचे प्रतिनिधित्व करते. जर विचार केला तर, भौतिक वास्तवाचा अक्षरशः विस्तार करू शकतो, जेव्हा ते वास्तविकता बदलू शकते. हे थोडं विचित्र वाटतंय ना? तर आता याबाबत अगदी साध्या-सोप्प्या भाषेत समजून घ्या. (india at 100 metaverse is superpower password for india which thing will make country first by 2047)
तंत्रज्ञानातील आश्चर्यकारक प्रगती असूनही, आपण सध्या मोठ्या प्रमाणावर 2D संचारावर अवलंबून आहोत – तुम्ही झूम किंवा MS टीम्सवर पाहता त्यासारखेच काही. तुमच्या व्हर्च्युअल मीटिंग्ज आहेत, पण तुम्ही भौतिक ठिकाणी एकत्र आहात असे तुम्हाला वाटत नाही.
तुम्हाला कसं वाटेल की, जेव्हा तुम्ही समोर नसताना देखील एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे टाकून पाहू शकाल किंवा देहबोली वाचण्यास सक्षम असाल? तुम्ही “बीम मी अप, स्कॉटी” (स्टार ट्रेकमध्ये बोलला जाणारा एक वाक्प्रचार, ज्याचा अर्थ आहे, मला इथून बाहेर काढा) सारखे प्रकार देखील करू शकता आणि तुमचा डिजिटल अवतार टेलिपोर्ट करून झटक्यात एखाद्या फॅक्टरीला भेटही देऊ शकतं, किंवा दुकानात नवीन कपडे वापरून पाहण्यासाठी सक्षम असेल.
आता यासाठी आपल्याला गरज आहे फक्त 3D कम्युनिकेशन तंत्रज्ञानाची. हे काम प्रगतीपथावर आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. यासाठी आपल्याला भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी तोपर्यंत म्हणजेच 2047 पर्यंत वाट पाहावी लागणार नाही.. आता फक्त चार वर्षच आपल्याला वाट पाहावी लागणार आहे.. म्हणजे 2027 पर्यंतच थांबावं लागेल. ज्यानंतर आपल्याला मेटावर्सचा खराखुरा अनुभव घेता येईल.