Horoscope In Marathi : या राशीच्या लोकांच्या घरात सुख-शांती नांदेल! पण काहींच्या जीवनात साडेसाती, कारण...

मुंबई तक

ADVERTISEMENT

24 September 2024 horoscope marathi,
Ajche Rashi Bhavishya
social share
google news

बातम्या हायलाइट

point

या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

point

या राशीच्या लोकांनी सावध राहा

point

या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये होईल प्रगती

24 September 2024 Horoscope: ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं जातं. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याची माहिती दिली जाते. 24 सप्टेंबर 2024 ला मंगळवार आहे. मंगळवारच्या दिवशी हनुमानाची पूजा करतात. धार्मिक मान्यतेनुसार, हनुमानाची पूजा केल्यानं सुख-समृद्धी प्राप्त होते. ज्योतिष गणनेनुसार, 24 सप्टेंबरचा दिवस काही राशींसाठी शुभ असणार आहे. तर काही राशींच्या लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊयात सर्व राशींबद्दल सविस्तर माहिती.

ADVERTISEMENT

मेष राशी 

आज मेष राशीच्या लोकांना कौटुंबीक सहकार्य मिळेल. आयुष्यात नवीन गोष्टी सुरु करा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कार्यालयीन कामकाजात व्यस्त राहाल. 

हे वाचलं का?

वृषभ राशी

आज वृषभ राशीच्या लोकांची व्यवसायीक स्थिती चांगली राहिल. आरोग्य संबंधीत गोष्टीमध्ये दिलासा मिळेल. लाईफस्टाईलमध्ये थोडे बदल होतील. मित्रांसोबत प्रवासाचा योग बनेल.

ADVERTISEMENT

मिथुन राशी 

ADVERTISEMENT

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असेल. कार्यात सकारात्मक रिझल्ट मिळेल. कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी वाढेल. आर्थिक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल.

कर्क राशी

आज कर्क राशीच्या लोकांची कोर्ट-कचेरीच्या प्रकरणात सुटका होऊ शकते. सामाजिक जीवनात प्रगती होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळेल. घरात सुख शांती नांदेल.

सिंह राशी

आज सिंह राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होऊ शकतो. नवीन कामांची सुरुवात होईल. कौटुंबीक जीवनात संकटं येऊ शकतात. आरोग्याबाबत दिलासा मिळेल.

कन्या राशी 

आज कन्या राशीच्या लोकांना अनेक सोर्सकडून धनप्राप्ती होईल. घरात पाहुणे आल्याने आनंदाचं वातावरण निर्माण होईल. आजच्या दिवशी दूरचा प्रवास योग असेल.

तुळा राशी 

तुळा राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. पूर्वीच्या समस्या दूर होतील. कार्यालयात नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळेल. घरात वादविवादांपासून सावध राहा. प्रियकराचं प्रेम आणि सपोर्ट मिळेल.

वृश्चिक राशी

आज व्यवसायीक जीवन आव्हानात्मक असेल. कुटुंब आणि मित्रांसोबत चांगली वेळ घालवाल. आरोग्यात सुधारणा होईल. नोकरी करणारे व्यस्त राहतील. आर्थिक गोष्टीत चढ-उतार पाहायला मिळेल.

धनु राशी 

आज धनु राशीच्या लोकांच्या व्यावसायीक जीवनात अडचण निर्माण होऊ शकते. संपतीबाबत वादविवाद होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील.

मकर राशी 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. मन प्रसन्न राहणार नाही. उद्योगात आर्थिक नुकसान होऊ शकतं. विचार करून गुंतवणूक करा.

कुंभ राशी

आज कुंभ राशीच्या लोकांच्या मनासारखं होईल. घरात धार्मिक कार्याचं आयोजन होऊ शकतं. करिअरमध्ये प्रगती होईल. कार्यालयातील राजकारणापासून सावध राहा.

मीन राशी 

मीन राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होईल. कुटुंबासोबत ट्रीपला जाऊ शकता. आरोग्य उत्तम राहील.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT