Numerology: जाणून घ्या तुमच्या आयुष्यातील कोणते वर्ष असेल खूप शुभ अन् कोणतं वर्ष...
Numerology Radix: ज्योतिषशास्त्रीय गणना ज्या संख्येच्या मदतीने केली जाते, त्यांच्या मदतीने तुम्ही तुमचं भविष्य देखील जाणून घेऊ शकता. अंकशास्त्रानुसार, कोणते वर्ष तुमच्यासाठी शुभ आणि समृद्धीचे ठरू शकते हे जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ज्योतिषशास्तात अंकशास्त्राला असतं प्रचंड महत्त्व
जाणून घ्या कोणत्या मूलांकासाठी कोणतं वर्ष असतं शुभ
कोणते वर्ष तुमच्यासाठी ठरेल शुभ आणि समृद्धीचे?
Numerology Radix Number: मुंबई: ज्याप्रमाणे वैदिक ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रह आणि नक्षत्र इत्यादींवरून व्यक्तीचे भविष्य जाणून घेता येते, त्याचप्रमाणे अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयुष्याशी संबंधित शुभ किंवा अशुभ काळ जाणून घेऊ शकता. अंकशास्त्रानुसार कोणते वर्ष तुमच्यासाठी शुभ ठरू शकते हे जाणून घेऊया.
पाहा कोणत्या मूलांकाच्या लोकांसाठी कोणतं वर्ष असतं सर्वात शुभ!
मूलांक 1 - अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो. मूलांक 1 चा स्वामी सूर्य आहे. ज्याला वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा राजा मानले जाते. असे मानले जाते की 1, 10, 19, 28 यांचा मूलांक 1 असतो जो या लोकांच्या आयुष्यात खूप महत्वाचा मानला जातो. त्याचप्रमाणे मूलांक 1 असलेल्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यातील 37, 46, 55, 64 आणि 73वं वर्ष जास्तीत जास्त शुभ आणि समृद्धी प्रधान करणारं असतं.
हे ही वाचा>> Diwali 2024 calendar: वसुबारस ते भाऊबीज...तारीख आणि मुहूर्त जाणून घ्या एका क्लिकवर
मूलांक 2 - अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 02, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो. अंकशास्त्रानुसार, मूळ क्रमांक 02 असलेले लोक खूप सर्जनशील असतात. त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यातील 2, 11, 20, 29, 38, 47, 56, 65, 74 आणि 83 वं वर्ष हे खूप शुभ आणि यशस्वी असतं.
मूलांक 3 - अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूळ संख्या 3 असते. अंकशास्त्रानुसार 3, 12, 21, 30, 39, 48, 57, 66, 75 अंक असलेल्या लोकांच्या आयुष्यातील वर्षे शुभ आणि यशस्वी ठरतात.










