Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना एक शेवटची संधी, नाहीतर अर्ज होणार बाद!
Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 1 कोटी 45 लाख 76 हजार 091 महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केल्याची माहिती आहे.आणि आतापर्यंत एकूण 1 कोटी 34 लाख 30 हजार 784 अर्ज पात्र ठरली आहेत. त्यामुळे नोंदणी केलेल्या महिलांचा आकडा आणि पात्र उमेदवारांचा आकडा पाहता साधारण अंदाजे 11 लाख 45 हजार 235 अर्ज बाद ठरण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अनेक महिलांनी अर्ज करताना चूका केल्या आहेत
या चुका सुधारण्याची शेवटची संधी
कशी दुरूस्ती कराल?
Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 1 कोटी 45 लाख 76 हजार 091 महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केल्याची माहिती आहे.आणि आतापर्यंत एकूण 1 कोटी 34 लाख 30 हजार 784 अर्ज पात्र ठरली आहेत. त्यामुळे नोंदणी केलेल्या महिलांचा आकडा आणि पात्र उमेदवारांचा आकडा पाहता साधारण अंदाजे 11 लाख 45 हजार 235 अर्ज बाद ठरण्याची शक्यता आहे. या बाद ठरलेल्या महिलांसाठी एक शेवटची संधी आहे. नेमकी ही संधी काय आहे? हे जाणून घेऊयात. (ladki bahin scheme last chance for women to edit and resubmit aditi tatkare eknath shinde)
ADVERTISEMENT
अनेक महिलांनी अर्ज करताना अनेक चूका केल्या आहेत. जसे आधारकार्डवर फोटो नाही. हमीपत्र अपलोड केले नाही.आधार कार्डवर संपू्र्ण नाव नाही.चुकीची कागदपत्रे अपलोड करणे, बँकेचा तपशीव व्यवस्थित न भरणे, कागदपत्र आणि फॉर्ममध्ये तफावत अशा अनेक कारणामुळे तुमचे अर्ज हे दुरूस्तीसाठी पाठवण्यात आले आहे. ही दुरूस्ती करून तुम्हाला अर्ज पुन्हा अपलोड करायचे आहेत. पण ही दुरस्तीची तुमच्याजवळ शेवटची संधी असणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरून सबमीट करा. नाहीतर तुमची ही संधी देखी वाया जाईल.
हे ही वाचा : Mumbai tak Baithak 2024 Schedule: विधानसभेआधी उडणार धुरळा! ‘मुंबई Tak बैठक’मध्ये 'हे' दिग्गज मांडणार व्हिजन
दरम्यान अर्ज पुन्हा सबमीट केल्यानंतर तुम्हाला अर्जाचा स्टेटस नारीशक्ती दूत अॅपच्या माध्यमातून पाहता येणार आहे. आपल्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी नारीशक्ती दूत अॅप मध्ये केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यामध्ये तुम्ही केलेले अर्ज दाखवण्यात येतील. आपल्याला ज्या अर्जाचे स्टेटस पहायचे आहे त्या अर्जावर क्लिक करा. आपल्या समोर आपल्या अर्जाची सद्य स्थिति पाहायला मिळेल.
हे वाचलं का?
स्टेटसमधल्या 'या' पर्यायाचा अर्थ काय?
Approved
जर तुम्हाला अर्जात स्टेटस Approved असे दाखवत असेल तर अभिनंदन तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमीट झाला आहे. आता आपल्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
Pending for Approval
आपल्या अर्जात असा पर्यंत दाखवत असेल तर आपला अर्ज अजून तपासण्यात आला नाही आपल्याला अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे आपला अर्ज लवकरच तपासण्यात येईल.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Vinesh Phogat : 'या' खेळाडूला कोर्टाने दिला न्याय, आता विनेशला रौप्य मिळणार?
Edit and Resubmit
आपल्या अर्जात असा पर्याय दाखवत असल्यास आपण आपल्या अर्जातील त्रूटी काढणे आवश्यक आहे. आपल्या अर्जात जी त्रूटी दिली आहे ती त्रूटी काढून आपला अर्ज परत सबमीट करावा लागणार आहे.
ADVERTISEMENT
Reject
जर आपल्या अर्जात वरील प्रमाणे म्हणजे REJECT हा पर्याय दाखवत असेल तर आपल्याला आपला अर्ज का reject केला. या बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. त्या कारणास्तव आपला अर्ज रीजेक्ट करण्यात आलेला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT