Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'ना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana scheme when will women get december installment mukhymanti majhi ladki bahin yojana scheme
महिलांना डिसेंबरमध्ये खात्यात येणाऱ्या पैशाची प्रतिक्षा लागली
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलांना नोव्हेंबर पर्यंतचे पैसे मिळाले

point

7500 रूपये खात्यात झाले जमा

point

डिसेंबरला पैसे कधी मिळणार?

Mukhyamantri ladki Bahin Yojana Scheme: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत चौथ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा झाले आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्रितपणे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे आता महिलांना डिसेंबरमध्ये खात्यात येणाऱ्या पैशाची प्रतिक्षा लागली आहे. त्यामुळे हे पैसे नेमके कधी मिळणार आहेत? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme when will women get december installment mukhymanti majhi ladki bahin yojana scheme) 

ADVERTISEMENT

सध्या महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दिवाळीत योजनेचे पैसे मिळणार नाही, कारण...

निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश 

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सरकारच्या सर्व विभागांकडे आर्थिक लाभ देऊन मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या योजनांची माहिती विचारली होती. त्यात महिला व बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेंतर्गत मोठा आर्थिक लाभ दिला जात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार आयोगाने या विभागाकडून यासंबंधीची योग्य ती माहिती मागवली होती. त्यात विभागाने या योजनेला केला जाणारा निधीचा पतपुरवठा 4 दिवसांपूर्वीच थांबवण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. याचा अर्थ निवडणूक आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

डिसेंबरच्या हप्त्याचे काय होणार? 

महिलांच्या खात्यात आतापर्यंत 7500 जमा झाले आहेत. म्हणजेच नोव्हेंबर पर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात आले आहेत. आता महिलांना डिसेंबरच्या हप्त्याची उत्सुकता लागली आहे. पण आचारसंहितेमुळे राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा निधी थांबवला आहे. तसेच नवीन अर्ज प्रक्रियाही बंद केली आहे. आता सुत्रानुसार नवीन सरकार स्थापण झाल्यानंतर डिसेंबरचे पैसे मिळण्याचा अंदाज आहे. 

हे ही वाचा : ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! दिवाळी बोनस नक्की मिळणार का? सरकारने दिली मोठी अपडेट

2 कोटी महिलांनी घेतला लाभ 

दरम्यान आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने आतापर्यंत 2 कोटी 20 लाख महिलांनी लाभ घेतला होता. या महिलांच्या खात्यात आतापर्यंत जुलै ते नोव्हेंबर अशा 5 महिन्यांचे 7500 रूपये जमा झाले आहेत. यानंतर आता महाराष्ट्रात निवडणूक लागली आहे. या निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्याचा लाभ महिलांना डिसेंबर महिन्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT