Ladki Bahin Yojana : फक्त 'या' महिलांच्या खात्यात 4500 होणार डिपॉझिट, तुम्ही ठरणार का पात्र?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana scheme these women get 4500 installment amount mukhymantri majhi ladki bahin yojana scheme ajit pawar aditi tatkare eknath shinde
अशात आता एक नवीन नियम बदलल्याची माहिती समोर आली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलांच्या खात्यात 4500 जमा होणार आहेत.

point

31 जुलैनंतर अर्ज केलेल्यांना मिळणार लाभ

point

तीन महिन्याचे एकत्रित पैसे मिळणार

Mukhmantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक महिलांना घेता यावा यासाठी अनेक नियमात बदल करण्यात आले आहेत.विशेष म्हणजे योजनेच्या पैशाचे वाटप सूरू असताना देखील हे बदल सूरू आहेत. अशात आता एक नवीन नियम बदलल्याची माहिती समोर आली आहे. या बदलानुसार आता त्या महिलांच्या खात्यात (Women Accout) थेट  जमा होणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी कोणत्या महिला पात्र ठरणार आहेत? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme these women get 4500 installment amount mukhymantri majhi ladki bahin yojana scheme ajit pawar aditi tatkare eknath shinde) 

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रूपये जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. या महिलांना 31 जुलैपर्यंत आपला अर्ज दाखल  केला होता. त्यामुळेच त्याच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झाले आहेत. 31 जुलैनंतर अर्ज भरणाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीयेत. 

हे ही वाचा : Badlapur : 'DCP चा फोन आला, FIR बदललं...ते प्रकरण दाबण्यासाठी...' कुटुंबीयांनी सांगितली Inside Story

खरं तर या योजनेची मुदत सुरूवातीला एकाच महिन्याची देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा ऑगस्ट 31 पर्यंत देण्यात आली होती. आता ही अर्ज प्रक्रिया निरंतर सूरू राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे महिलांना दिलासा तर मिळालाय. पण जितका उशीर अर्ज करण्यास होणार आहे. तितका उशीर योजनेचे पैसे जमा करण्यास होणार आहे. 

हे वाचलं का?

4500 कसे खात्यात येणार? 

खरं तर ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे त्यांचे अर्ज हे मंजूर झाले आहेत. त्याच महिलांच्या खात्यात 4500 जमा होणार आहेत. आता 4500 रूपये कसे? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे मिळून 4500 महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळणार आहे. ज्या महिलांचे अर्ज 31 ऑगस्ट पर्यंत जमा होतील त्यांच्याच खात्यात 4500 रूपये जमा होणार आहे. 

हे ही वाचा : Badlapur School Case: 'हे सगळं...', आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचा खळबळजनक आरोप

त्यामुळे जर तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल. तर तुमच्याकडे अजूनही 9 दिवस आहेत. या 9 दिवसात तुम्हाला तुमचा अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर संप्टेंबर महिन्यात तुमच्या खात्यात 4500  जमा होणार आहेत.  

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT