Ladki Bahin Yojana : 'त्या' महिलांना दुसऱ्या टप्प्यात मिळणार लाभ, बँकेत 4500 जमा होणार?
Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्यात अनेक महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झाले होते. यामध्ये फोटो स्पष्ट नसणे, कागदपत्र न जोडणे, फॉर्म अर्धवट भरणे अशी अनेक कारणे होती. त्यामुळे अनेक महिलांचे अर्ज हे रिजेक्ट करण्यात आली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पहिल्या टप्प्यात अनेक महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले

महिलांना पहिल्या टप्प्यात योजनेचा लाभ मिळालाच नाही

दुसऱ्या टप्प्यात महिलांना योजनेचा लाभ मिळणार का?
Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पहिल्या टप्प्यात अनेक महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा झाले आहेत. या महिलांना आता सप्टेंबरमध्ये (Samptember) येणाऱ्या तिसऱ्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. तसेच पहिल्या टप्प्यात अनेक महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झाले होते. त्यानंतर या महिलांनी अर्जात पुन्हा दुरूस्ती करून सबमिट (Application Submit) केले होते. या महिलांना योजनेचा लाभ मिळणार का? आणि खात्यात (Bank Account) किती रूपये जमा होणार ? हे जाणून घेऊयात.
लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्यात अनेक महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झाले होते. यामध्ये फोटो स्पष्ट नसणे, कागदपत्र न जोडणे, फॉर्म अर्धवट भरणे अशी अनेक कारणे होती. त्यामुळे अनेक महिलांचे अर्ज हे रिजेक्ट करण्यात आली होती.त्यामुळे अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकला नव्हता.
अर्ज रिजेक्ट झाल्यानंतर अनेक महिलांनी आपल्या अर्जात दुरूस्ती करून पुन्हा वेबसाईट किंवा अॅपवर सबमिट केला होता. त्यामुळे ज्या महिलांनी अर्ज दुसऱ्यांदा सबमिट केला आहे, आणि ज्यांना अर्ज मंजूर झाल्याचा मेसेज आला आहे. त्या महिलांच्या खात्यात आता दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकत्रित मिळून 4500 रूपये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे.
हे ही वाचा : Kavita Raut : ''जातीमुळे शासकीय नोकरीपासून वंचित ठेवलं'', आंतरराष्ट्रीय धावपटूचा सरकारवर गंभीर आरोप
अर्ज पडताळणीला सुरुवात
तसेच 31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरावर पडताळणी सूरू आहे. जिल्हास्तरावर मान्यता प्राप्त अर्जाचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच ती यादी बँककडे पाठवली जाणार आहेत.ही सगळी प्रक्रिया युद्ध पातळीवर सूरू असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी एक्सवर दिली होती.