Kavita Raut : ''जातीमुळे शासकीय नोकरीपासून वंचित ठेवलं'', आंतरराष्ट्रीय धावपटूचा सरकारवर गंभीर आरोप
Savarpada Express Kavita Raut : आदिवासी 17 संवर्ग पेसा पदभरतीचा मुद्दा चांगलाच चिघळला आहे. जे.पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विकास भवन (Adivasi Vikas bhavan) येथे मागील 4 दिवसांपासून आदिवासी उमेदवारांचे आंदोलन सूरू आहे. कविता राऊत यांनी आदिवासी विकास भवन परिसरात होणाऱ्या आंदोलनाला भेट दिली होती.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मी आदिवासी असल्याने अन्याय झाला
माझ्यासोबत जातीयवाद करण्यात आला
मला शासकीय नोकरीपासून वंचित ठेवण्यात आलं
Savarpada Express Kavita Raut : सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत (Kavita Raut) यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ''मी आदिवासी असल्याने जातीची शिकार झाले असून, मला शासकीय नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे, असा गंभीर आरोप कविता राऊत यांनी सरकारवर केला आहे. कविताच्या आरोपानंतर आता (Adivasi Protest) आदिवासी लोकप्रतिनीधीनींही सरकारला लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. (savarpada express kavita raut deprived of government jobs because of caste nashik adivasi vikas bhavan paisa meeting)
आदिवासी 17 संवर्ग पेसा पदभरतीचा मुद्दा चांगलाच चिघळला आहे. जे.पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विकास भवन (Adivasi Vikas bhavan) येथे मागील 4 दिवसांपासून आदिवासी उमेदवारांचे आंदोलन सूरू आहे. कविता राऊत यांनी आदिवासी विकास भवन परिसरात होणाऱ्या आंदोलनाला भेट दिली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना कविता राऊत यांनी अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली होती.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana Aadhar Link: पैसे मिळाले नाही तर करा 'या' गोष्टी, लगेच मिळतील 3000 रु.
''मी आदिवासी असल्याने जातीची शिकार झाले असून, मला शासकीय नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. शासकीय धोरणाप्रमाणे नोकरीपासून अनेकवेळा अर्ज देऊनही माझ्या अर्जाकडे हेतुपरस्पर दुर्लक्ष करण्यात आले. माझ्यापेक्षा कमी गुण आणि खेळात कमी श्रेणी असलेल्या खेळाडूंना शासकीय नोकरी देण्यात आली आहे, असा गंभीर आरोप आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी केला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
कविता राऊत नेमकं काय म्हणाली?
माझी ज्युनिअर खेळाडू कविता बाबर यांनी माझ्याबरोबर पदवी प्राप्त केली. माझ्यापेक्षा कमी पदकं असताना देखील गट 'अ' मध्ये त्यांना उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती देण्यात आली आहे. परंतू माझ्यासोबत जातीयवाद करून 10 वर्षापासून मला शासकीय नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे, असे कविता राऊत म्हणाल्या आहेत.
दरम्यान आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी राष्ट्रकूल स्पर्धेत भारताला पहिलं पदत मिळवून दिलं आहे. चीनमधील आशियाई स्पर्धा 2011, भारतातील दक्षिण आशियाई स्पर्धा, ब्राझील येथील ऑलिम्पिक स्पर्धा 2016 मघ्ये चमकदार कामगिरी करत महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Viral Video: महिलेला खांद्यावर घेऊन धावतच सुटली...', महिला पोलिसाचा 'तो' Video नेमका काय?
शासनाच्या धोरणाप्रमाणे जे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची मान उंचावतात, त्यांना शासकीय नोकरीत स्थान दिले जाते. यासाठी शिक्षण आणि वयाची अट शिथिल केली जाते. कविता राऊत यांनी 2014 मध्ये शासकीय नोकरीसाठी अर्ज दिला होता. शैक्षणिक अर्हतेनुसार राऊत या गट क मधील पदासाठी पात्र असूनही त्यांना अगोदर पदवी प्रात्प करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार कविता राऊत यांनी 2017 मध्ये पदवीचे प्रमाणपत्र शासनाला सुपूर्द केले. 2018 मघ्ये शासनाने 32 खेळाडूंना नियुक्ती दिली. मात्र त्यात राऊत यांना स्थान देण्यात आले नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT