Ladki Bahin Yojana Aadhar Link: पैसे मिळाले नाही तर करा 'या' गोष्टी, लगेच मिळतील 3000 रु.
Ladki Bahin Yojana Money: माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झालेला असून देखील जर पैसे बँक खात्यात आले नसतील तर आपल्याला फक्त एकच गोष्ट करावी लागेल. पण नेमकी कोणती गोष्ट ते जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणं सुरू

अनेक महिलांचे अर्ज मंजूर पण खात्यात पैसे आले नाही

बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणं आवश्यक
Ladki Bahin Yojana Aadhar Link: मुंबई: माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल पण तुम्हाला योजनेअंतर्गत 3000 रुपये मिळाले नसतील तर काही गोष्टी झटपट करणं हे महत्त्वाचं आहे. कारण त्यानंतरच तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणे सुरू होईल. (ladki bahin yojana aadhar link if you dont get money under ladki bahin yojana do this work and you will get rs 3000 immediately)
माझी लाडकी बहीण (mazi ladki bahin yojana) योजनेंतर्गत राज्यातील महिलांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून दरमहा 1500 रुपयांच्या आर्थिक मदतीची तरतूद ही शिंदे सरकारकडून राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आली होती. 28 जून 2024 पासून ही योजना राज्यात लागू करण्यात आली.
हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana : योजनेचे 4500 रूपये नेमक्या कोणत्या खात्यात येणार?
या योजनेच्या अंमलबजावणीनंतर महिलांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, त्याअंतर्गत महिला नारीशक्ती दूत ॲप आणि योजनेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात, याशिवाय राज्य सरकारद्वारे ऑफलाइन माध्यमातून अर्ज महिलांना अर्ज करता येणार आहे. ज्यासाठी फॉर्मही जारी केले आहेत.
योजनेसाठी अर्ज केल्यानंतर महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले असून, या योजनेंतर्गत 14 ऑगस्ट 2024 पासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपयांचा पहिला हप्ता वर्ग करण्यात आला आहे, मात्र तरीही राज्यात अनेक या योजनेसाठी महिलांचे अर्ज स्वीकारले जात असताना त्यांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळालेला नाही.