Ladki Bahin Yojana : योजनेचे 4500 रूपये नेमक्या कोणत्या खात्यात येणार?
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेत ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैआधी मंजूर झाले आहेत. त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे पहिल्या टप्प्यात जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्याची रक्कम म्हणजेच 1500 रूपये जमा होणार आहे. आणि ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैनंतर मंजूर झाले आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
तीन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार का?
4500 रूपये कुणाच्या खात्यात येणार?
किती तारखेला खात्यात पैसे येणार?
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रूपये जमा झाले आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ज्या महिलांच्या खात्यात आधीच 3000 रूपये जमा झाले आहेत, त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याच्या 1500 चा हप्ता जमा होणार आहे. तर ज्या महिलांना अर्ज ऑगस्टमध्ये मंजूर झाला आहे, त्याच्या खात्यात नेमके किती रूपये जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana 50 lakhs women get benefit of mukhyamantri ladki bahin yajana scheme aditi tatkare eknath shinde ajit pawar)
ADVERTISEMENT
लाडकी बहिण योजनेत ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैआधी मंजूर झाले आहेत. त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे पहिल्या टप्प्यात जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्याची रक्कम म्हणजेच 1500 रूपये जमा होणार आहे. आणि ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैनंतर मंजूर झाले आहेत. त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे म्हणजेच एकूणच 4500 जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात एकही पैसा जमा झाला नाही आहे. आणि ऑगस्टमध्ये या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत. त्या महिलांच्या खात्यात योजनेचे 4500 जमा होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : Sanjay Raut: '...तर राणे आणि त्यांची मुलं रस्त्यावर ना&% नाचले असते', राऊतांची राणेंवर बोचरी टीका
दुसऱ्या टप्प्यात 50 लाख महिलांना मिळणार लाभ
लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
हे वाचलं का?
अर्जाची चाचपणी सूरू
31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरावर पडताळणी सूरू आहे. जिल्हास्तरावर मान्यता प्राप्त अर्जाचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच ती यादी बँककडे पाठवली जाणार आहेत. सगळी प्रक्रिया युद्ध पातळीवर सूरू असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी एक्सवर दिली होती. त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची पडताळणी युद्धपातळीवर सूरू झाली आहे. या काळात महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येणार आहेत. या मेसेजनंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांनी आपला अर्ज मंजूर होतोय का? याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
'या' तारखेनंतर खात्यात पैसे जमा होणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत. त्याचा निधी 31 ऑगस्टपासून वितरीत होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. दरम्यान या योजनेत ज्या महिलांनी 31 जुलै नंतर अर्ज केले आहेत. त्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरावर पडताळणी सूरू आहे. या दरम्यान ज्या महिलांचे अर्ज हे मंजूर झाले आहेत. त्या महिलांना दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार आहे. अजूनही 4 दिवस बाकी आहेत. या दिवसात अनेक अर्ज मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात अनेक महिलांना लाभ मिळणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Gold Price Today: हद्दच झाली! घसरणीनंतर सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; एका क्लिकवर बघा आजचा भाव...
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT