Majhi Ladki Bahin Yojana: महिलांसाठी खुशखबर, पाहा खात्यात किती वाजता येणार 4500 रुपये?

मुंबई तक

ADVERTISEMENT

पाहा खात्यात किती वाजता येणार 4500 रुपये?
पाहा खात्यात किती वाजता येणार 4500 रुपये?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे लवकरच मिळणार

point

कोणत्या तारखेला आणि किती वाजता मिळणार पैसे?

point

4500 रुपये नेमके कोणत्या महिलांना मिळणार?

Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment Out: मुंबई: माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज स्वीकारले गेले आहेत आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दोन हप्त्यांचे पैसे पाठवण्यात आले आहेत. तेव्हापासून आता राज्यभरातील महिला या तिसरा हप्ता कधी येणार याची वाट पाहत आहेत. याचबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. आता लवकरच पात्र महिलांच्या  बँक खात्यात तिसरा हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. (majhi ladki bahin yojana 3rd installment good news for women see what time rs 4500 will be in the account)

माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता (Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment)

माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा त्याच महिलांना मिळेल ज्यांचे बँक खाते हे आधारशी जोडलेले आहे आणि ज्यांच्या बँक खात्यात DBT इनेबल आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम बऱ्याच महिलांना मिळालेले नाहीत. त्यामुळे आता दोन्ही हप्त्यांचे पैसे हे तिसऱ्या हप्त्यात एकत्रितरित्या मिळू शकतात. म्हणजे काही महिलांना थेट 4500 रुपये मिळण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा>> Mazi Ladaki Bahin: 4500 रुपये कोणत्या तारखेला मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Majhi Ladki Bahin Yojana 2024-Overview

योजनेचं नाव

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोणी सुरू केली

शिंदे सरकार

आतापर्यंत किती अर्ज आले?

2 कोटीहून अधिक

ADVERTISEMENT

कितवा हप्ता मिळणार?

तिसरा

ADVERTISEMENT

कोणत्या तारखेला मिळणार?

तारीख अद्याप निश्चित नाही

पैसे मिळण्याची पद्धत

ऑनलाइन

राज्य

महाराष्ट्र

वेबसाइट

https://ladakibahin.maharashtra.gov.in/


माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी आणि किती वाजता? (Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment Date and Time)

माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 14 ऑगस्ट 2024 रोजी एकत्र पाठवण्यात आला होता, तेव्हापासून सर्व महिला या आगामी तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सुरुवातीला माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा 15 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजेपूर्वी सर्व पात्र महिलांच्या खात्यावर पाठवला जाईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र, अद्याप तरी तिसरा हप्ता जमा झालेला नाही.

हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana : महिलांनो...1500 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?

अधिकृत वेबसाइटवर पेमेंटच्या तारखेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु लवकरच म्हणजे येत्या दोन-तीन दिवसात तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे महिलांच्या खात्यात पाठविले जातील. असं सूत्रांकडून समजतं आहे. दरम्यान, ज्या दिवशी हे पैसे खात्यात पाठविले जातील तेव्हा ते संध्याकाळी 4 वाजेच्या आत मिळतील.

माझी लाडकी बहीण योजना आधार सीडिंग म्हणजे काय? (Majhi Ladki Bahin Yojana Aaadhar Seeding)

माझी लाडकी बहीण योजनेचे पेमेंट पाठवल्यानंतरही अनेक महिलांनी तक्रार केली आहे की, लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही, तर अशा तक्रार केलेल्या महिलांनी प्रथम त्यांचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक करावे. तसेच डीबीटी देखील त्यांनी इनेबल करून घ्यावे.

माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचं स्टेट्स कसं तपासावं? (Majhi Ladki Bahin Yojana Application Status)

माझी लाडकी बहीण योजना स्टेट्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या फॉर्मची स्थिती तपासू शकता आणि तुमच्या फॉर्मची पडताळणी झाली आहे की नाही हे जाणून घेऊ शकता.

Step.1 सर्वप्रथम माझी लाडकी बहीणच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
Step.2 अर्जदार लिंकवर क्लिक करा.
Step.3 तुमचा मोबाइल नंबर आणि पासवर्ड टाका.
Step.4 कॅप्चा भरा आणि लॉगिन वर क्लिक करा.
Step.5 लॉगिन पेजमध्ये  Application वर क्लिक करा.
Step.6 आता प्रलंबित किंवा मंजूर हे स्टेट्स आपल्याला दिसेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT