Mazi Ladaki Bahin: 4500 रुपये कोणत्या तारखेला मिळणार? समोर आली मोठी अपडेट

मुंबई तक

ADVERTISEMENT

4500 रुपये कोणत्या तारखेला मिळणार?
4500 रुपये कोणत्या तारखेला मिळणार?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

point

आदिती तटकरे यांनी नेमकी माहिती दिली आहे

point

सप्टेंबर महिन्यातील 1500 रुपयांसाठी तारीख कोणती?

mazi ladaki bahin: मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्जासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण ज्या महिला या आधीच या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत त्यांना आता सप्टेंबर 2024 महिन्याचे 1500 रुपये नेमके कधी मिळणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. आता याबाबत राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी नेमकी माहिती दिली आहे. (mazi ladaki bahin rs 4500 will be deposited in womens account on which day on which date big information came out)

ADVERTISEMENT

जुलै महिन्यात ज्या महिला पात्र ठरल्या होत्या त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे मिळून एकूण 3000 रुपये मिळाले होते. त्यामुळे आता या महिलांना सप्टेंबर महिन्यातील 1500 रुपये कधी मिळणार? याकडे डोळे लागून राहिले आहेत. याशिवाय ज्या महिलांचे अर्ज सप्टेंबर महिन्यात पात्र ठरणार आहेत त्यांना तर थेट 4500 रुपये मिळणार आहेत. पण हे सगळे पैसे कधी मिळणार? त्याची तारीख काय? असे प्रश्न आता विचारले जात आहेत. ज्याबाबत आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना काही उत्तरं दिली आहेत.

सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?, पाहा मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या

'माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आमच्याकडे आतापर्यंत 2 कोटी 40 लाखांहून अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील जवळपास जुलै महिन्यातील 1 कोटी 7 लाख महिलांना लाभ हा ऑगस्ट महिन्यात दिला.'

हे वाचलं का?

हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana : महिलांनो...'या' दिवशी योजनेचा तिसरा हप्ता खात्यात होणार जमा?

'काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये कार्यक्रम झाला त्यात जवळपास 52 लाखांहून अधिक महिलांना लाभ वितरीत केला. सप्टेंबर महिना आणि जे काही अर्ज आतापर्यंत प्राप्त झाले असतील याची छाननी सुरू आहे आणि आम्हाला खात्री आहे की, साधारपणे 2 कोटीपेक्षा अधिक महिला या योजनेअंतर्गत पात्र ठरतील. आमचा तर प्रयत्न आहे की, जो अंदाज विभागाने लावला आहे की, अडीच कोटी महिलांपर्यंत योजना पोहचविण्याचा यात आम्ही निश्चितपणे सफल होऊ.' 

'पहिल्या टप्प्यातील मुदत ही 31 जुलैपर्यंत होती. या कालावधीमध्ये ज्या महिलांनी अर्ज भरला आणि ज्या पात्र ठरल्या त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे. योजनेची नोंदणी ही सुरूच राहणार आहे. आता सप्टेंबर महिन्यात देखील अर्ज प्राप्त होत आहेत. ज्या पात्र महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यातच लाभ दिला आहे. त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ आम्ही लवकरच वितरीत करणार आहोत.'

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana: ...तरच 4500 रुपये मिळणार, सरकारचा नवा GR पाहिला का?

'ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांना सुद्धा लाभाच्या वितरणाची सुरुवात होईल.' 

ADVERTISEMENT

'आमचा प्रयत्न आहे की, अधिकाधिक सुरळीत करण्याचा. 1 जुलै ते 31 जुलैपर्यंतचा लाभ आम्ही ऑगस्ट महिन्यात दिला 1 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट या कालावधीचा लाभ हा ऑगस्ट महिन्यातच वितरीत केला. यामुळे आमचा प्रयत्न आहे की, 1500 रुपये हे तो दर महिन्याला अधिकाधिक सुरळीत व्हावा.' 

'आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये हे पात्र महिलांना.. ज्यामध्ये जुलैपासून ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्यासह सर्व लाभ लवकरच वितरीत केला जाईल.' असं आदिती तटकरे म्हणाल्या. 

म्हणजेच अद्याप तरी सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरमधील हप्त्यासाठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. त्यामुळे आता नेमक्या कोणत्या तारखेला महिलांना पैसे मिळणार हे येत्या काही दिवसात समजणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT