UPI Payment : ‘या’ गोष्टींसाठी UPI द्वारे करता येणार 5 लाखांपर्यंतचे पेमेंट

रोहिणी ठोंबरे

शैक्षणिक संस्थांपासून रुग्णालयांपर्यंत आणि इतर छोट्या-मोठ्या पेमेंटसाठी UPI वापरणाऱ्या यूजर्ससाठी ही मोठी बातमी आहे. तसंच UPI द्वारे क्रेडिट कार्ड पेमेंट, म्युच्युअल फंड सबस्क्रिप्शन आणि विमा पॉलिसी पेमेंट करणार्‍यांसाठीही ही एक आनंदाची बातमी आहे.

ADVERTISEMENT

RBI Ordered UPI Payment limits Increases till Rs 5 Lakhs for these types of transaction
RBI Ordered UPI Payment limits Increases till Rs 5 Lakhs for these types of transaction
social share
google news

UPI Payment Limits Increase : शैक्षणिक संस्थांपासून रुग्णालयांपर्यंत आणि इतर छोट्या-मोठ्या पेमेंटसाठी UPI वापरणाऱ्या यूजर्ससाठी ही मोठी बातमी आहे. तसंच UPI द्वारे क्रेडिट कार्ड पेमेंट, म्युच्युअल फंड सबस्क्रिप्शन आणि विमा पॉलिसी पेमेंट करणार्‍यांसाठीही ही एक आनंदाची बातमी आहे. (RBI Ordered UPI Payment limits Increases till Rs 5 Lakhs for these types of transaction)

RBI ने UPI पेमेंटशी संबंधित दोन महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. आत्तापर्यंत UPI पेमेंटद्वारे काही हजारांचे पेमेंट शक्य होते, परंतु आता नवीन बदलामुळे लाखो रुपयांचे पेमेंट काही क्षणातच करता येणार आहे.

वाचा : Lok Sabha Security Breach : सुरक्षकांना चकमा देत लोकसभेत घुसखोरी! अश्रू धुरांचे लोळ

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये, जेव्हा पेमेंटची रक्कम जास्त असते, तेव्हा NEFT, RTGS किंवा ऑनलाइन बँक ट्रान्सफर सारख्या इतर पद्धती वापराव्या लागतात. या संपूर्ण प्रक्रियेत बराच वेळ जातो. कारण यासाठी अकाउंट आणि इतर डॉक्यूमेंट जोडणं म्हणजे अर्ध्या तासाचं काम एक-दोन तासांवर जातं. पण, नवीन प्रणाली सुरू झाल्यानंतर, QR कोड किंवा UPI ID द्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट सहज करता येणार आहे.

वाचा : Sindhudurg Crime : 19 वर्षीय दीर 35 वर्षीय वहिनीसोबत भाड्याच्या खोलीत राहिला, नंतर…

त्याचप्रमाणे, NEFT, RTGS किंवा ऑनलाइन बँक ट्रान्सफर या तीन प्रकारच्या पेमेंटसाठीही आता काम सोपे होणार आहे, ज्यांना बँकिंग भाषेत recurring पेमेंट म्हणतात. सहसा अशी पेमेंट e-mandates द्वारे केली जाते आणि पैसे तुमच्या खात्यातून ऑटो-डेबिट केले जातात. आतापर्यंत फक्त 15 हजार रुपयांपर्यंतचा पेमेंट ऑप्शन होता मात्र आता ही मर्यादा 1 लाख रुपये झाली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp