शिंदे सरकारची आणखी एक योजना, आता मुलींना नेमकं काय मिळणार मोफत?
Free Education Yojana: मोफत शिक्षण योजनेत ज्या मुलींच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशाच मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुलींना नेमकं काय मिळणार मोफत?

शिंदे सरकारची आणखी एक योजना

मोफत शिक्षण नेमकं कोणाला मिळणार?
Free Education: छाया काविरे, मुंबई: राज्यातील मुलींना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून मोफत शिक्षण योजना लागू करण्यात आलीय. मुलींसाठी 100 टक्के फी माफीच्या बातम्या किंवा पोस्ट तुम्ही वाचत असाल. मात्र, या योजनेतून मुलींची पूर्ण फी माफ होणार नाहीय. मग नेमकी किती फी माफ होणार? योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया काय असणार? ही योजना सरसकट लागू नाहीय मग नेमक्या अटी काय आहेत? अटीसोबतच या योजनेतील त्रुटी काय आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात सविस्तर. (shinde government free education yojana what are terms and conditions for free education scheme for girls no one benefits at all)
सर्वात आधी पाहूयात की या योजनेचा लाभ कोणत्या मुली घेऊ शकणार आहेत? ज्या मुलींच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशाच मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे ही योजना केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच लागू आहे. त्यामुळे कला, वाणिज्य, विज्ञान अशा पारंपरिक शाखांतील अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळणार नाहीय. फक्त व्यावसायिक उच्च शिक्षणासाठी ही योजना लागू आहे.
हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana Form: लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होणार की नाही?, छाननी सुरू
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग, कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभाग यात उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ होणार आहे. मात्र, मुलींनो तुमची फी 100 टक्के माफ होणार नाहीय. फक्त एक्साम फी आणि tution फी या योजनेतून माफ होणार आहे. त्यामुळे विकास निधी, हॉस्टेल फी, प्रयोगशाळा फी, लायब्ररी, मेस, हॉस्टेल यांना लागणारी फी आणि Deposit तुम्हाला भराव लागणार आहे. जवळपास 25 ते 35 टक्के फी विद्यार्थिनींना भराविच लागणार आहे. अधिक स्पष्ट होण्यासाठी नगरच्या विखे पाटील मेडिकल कॉलेजच हे फी स्ट्रक्चर पाहा.
एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेताना ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थिनीला एकूण 8 लाख 95 हजार फी भरावी लागत होती. यात ट्युशन आणि development फी 6 लाख 21 हजार भरावी लागत होती. जी आता 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलींना माफ करण्यात आलीय. मात्र, साधारण पावणे तीन लाख फी नोंदणी, इन्शुरन्स, लायब्ररी फी ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थिनीला भरावी लागणार आहे.