Explained : सर्वोच्च न्यायालयाचा समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास नकार, LGBTQ नेमकं आहे तरी काय?
समलिंगी विवाहावर (Same Sex Marriage) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज आपला निकाल सुनावला आहे. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर न्यायालयाने 11 मे रोजी निर्णय राखून ठेवला होता.
ADVERTISEMENT
Supreme Court’s refusal to recognize same-sex marriage : समलिंगी विवाहावर (Same Sex Marriage) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज आपला निकाल सुनावला आहे. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर न्यायालयाने 11 मे रोजी निर्णय राखून ठेवला होता. याचिकांवर सुनावणी करणाऱ्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठात मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एसके कौल, एसआर भट्ट, हिमा कोहली आणि पीएस नरसिम्हा यांचा समावेश होता. (Supreme Court’s refusal to recognize same-sex marriage Get Know about LGBTQ Community)
ADVERTISEMENT
या मुद्द्यावर 18 समलिंगी जोडप्यांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकारच्या विवाहाला कायदेशीर मान्यता द्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. पण आजच्या (17 ऑक्टोबर) निकालात समलिंगी विवाहाला मान्यता नाहीच असा निर्णय पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने घेतला आहे.
वाचा : Same Sex Marriage बाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पाहा नेमका निकाल काय
पण यासर्वात अनेकांच्या मनात हा पहिला प्रश्न येईल की LGBT म्हणजे काय? आणि या सर्वांमध्ये काय फरक आहे? चला तर मग याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात.
हे वाचलं का?
LGBTQ म्हणजे काय?
LGBTQ हा शब्द नाही, तर अनेक शब्दांनी बनलेला एक शॉर्ट फॉर्म आहे, जो व्यक्तीची लैंगिक प्रवृत्ती किंवा लिंगाचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. लैंगिक प्रवृत्ती ही व्यक्तींचे शारीरिक, भावनिक आकर्षण परिभाषित करते. खरं तर, LGBT हा एक शॉर्ट फॉर्म आहे. जे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर यांनी बनलेला आहे.
खरं तर, माणूस म्हणून, आपण विरुद्ध आकर्षणांना सामान्य मानतो आणि बाकीचे असामान्य मानतो. जसं पुरुषाचे स्त्रीकडे आकर्षण आणि स्त्रीचे पुरुषाकडे आकर्षण ही एक सामान्य प्रक्रिया आहे. परंतु या व्यतिरिक्त, आकर्षण अनेक रूपे घेऊ शकते, ज्याला आपण असामान्य म्हणतो आणि अनेक भिन्न श्रेणींमध्ये विभागतो.
ADVERTISEMENT
वाचा : Meera Borwankar Ajit pawar : “तू मला सोडून गेलास, मी तुला सोडणार नाही”
एलजीबीटीची सुरुवात कशी झाली?
1950 आणि 1960 च्या दशकात एलजीबीटीचा उदय होण्यापूर्वी, या समुदायातील लोकांना “गे समुदाय” म्हणून संबोधले जात असे. तसंच, 1969 हे वर्ष अमेरिकेच्या इतिहासातील एक टर्निंग पॉइंट म्हणून पाहिले जाते. हा काळ “गे राइट्स मूव्हमेंट” साठी अत्यंत महत्वाचा होता. चळवळ जसजशी पुढे सरकत गेली, तसतसे लोकांना समजू लागले की समलिंगी हा शब्द सर्व लैंगिक प्रवृत्ती आणि लिंग ओळख परिभाषित करत नाही. 1980 च्या दशकात, LGBT ला लोकप्रियता मिळाली आणि 1990 च्या दशकात अनेक कार्यकर्ता संघटनांनी ती स्वीकारली.
ADVERTISEMENT
LGBTQ चा सविस्तर अर्थ समजून घ्या…
- “L” म्हणजे लेस्बियन : “लेस्बियन” हा शब्द शारीरिक, भावनिकरित्या इतर स्त्रियांकडे आकर्षित झालेल्या स्त्रीचे वर्णन करतो.
- “G” म्हणजे गे : “गे” हा शब्द शारीरिक, भावनिकरित्या मुलांकडे किंवा पुरुषांकडे आकर्षित झालेल्या पुरुषाला सूचित करतो.
- “B” म्हणजे बायसेक्शुअल : बायसेक्शुअल हा शब्द एखाद्या व्यक्तीचे शारीरिक, भावनिकरित्या पुरुष किंवा स्त्री दोन्हीकडील आकर्षणाचं वर्णन करतो.
- “T” म्हणजे ट्रान्सजेंडर : “ट्रान्सजेंडर” हा शब्द अशा व्यक्तीचे वर्णन करतो ज्याचे वर्तन त्यांना जन्मावेळी असलेल्या लिंगाच्या विरुद्ध आहे. उदाहरणार्थ, स्त्रीप्रमाणे वागणारा पुरुष किंवा पुरुषाप्रमाणे वागणारी स्त्री.
वाचा : Same Sex Marriage: ‘समलैंगिकता ही केवळ…’, समलिंगी विवाहावर सुप्रीम कोर्ट काय देणार निकाल?
“Q” चा नेमका अर्थ काय?
समलिंगी समुदायाचे वर्णन करण्यासाठी वापरल्या जाणार्या जुन्या शब्दांपेक्षा LGBT खूप वेगळा शब्द आहे. परंतु तरीही ते गे, लेस्बियन, बायसेक्शुअल किंवा ट्रान्सजेंडर श्रेणींमध्ये न येणाऱ्या लोकांचे वर्णन करत नाही. यामुळे “Q” म्हणजे क्वीयर हे LGBT मध्ये जोडले गेले आणि ते LGBTQ झाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT