एग्जिट पोल

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांना मिळणार नाहीत लाडकी बहीण योजनेचे 4500! नियम काय आहे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana scheme last chance to get benefit of 4500 installment amout mukhymantri ladki bahin yojana
तिसऱ्या टप्प्यात पैसे जमा व्हायला सूरूवात झाली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोणत्या महिलांना मिळतील लाडकी बहीण योजनेचे पैसे?

point

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हा नियम महितीय का?

point

...तरच महिलांच्या खात्यात जमा होतील 4500 रुपये

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: देशातील नागरिकांसाठी भारत सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांना लाभ मिळतो. केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील कोट्यावधी लोकांसाठी योजना सुरु केल्या जातात. तसच राज्य सरकारेही जनतेसाठी विविध योजना सुरु करतात. विशेषत: गरिब लोकांसाठी या योजना सुरु केल्या जातात. 

सरकारकडून महिलांसाठीही अनेक प्रकारच्या योजना सुरु केल्या जातात. राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देत आहे. परंतु, योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही नियमावली तयार केली आहे. पण या नियमावलीत पात्र न ठरणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. काय आहे योजनेचा नियम, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

हे ही वाचा >> Kolhapur Crime: मुलाने केली आईची हत्या! हृदय, लिव्हर, मेंदूला मीठ मसाला लावून खाल्लं, कोर्टाने सुनावली सर्वात भयंकर शिक्षा

या महिलांना मिळणार नाहीत पैसे

माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने काही नियम आणि पात्रता घोषित केली आहे. ज्या महिलांच्या कुटुंबात वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक आहे. त्या महिलांना लाभ मिळणार नाही. ज्या कुटुंबातील सदस्य करदाता आहेत, त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाहीय.  तसच कुटुंबातील एखादा सदस्य भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही विभागात काम करत असेल, तसच या एखाद्या सदस्याला या योजनेच्या माध्यमातून 1250 रुपये मिळत असतील, तर अशा लोकांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Pune Helicopter Crash : पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं! 3 जणांचा जागीच मृत्यू

महिला किंवा तिच्या कुटुंबातील एखादा सदस्य भारत किंवा राज्य सरकारच्चया बोर्ड, निगम,मंडळ, उपक्रमाचा अध्यक्ष, संचालक किंवा सदस्य असेल, ते लोक या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. ट्रॅक्टर सोडून कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे चारचाकी वाहन असेल, तसच महिला आणि तिच्या कुटुंबातील सदस्याकडे पाच एकरहून अधिक जमिन असेल, तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही.

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर तिसऱ्या टप्प्यात कशाप्रकारे निधी हस्तांतरण झाले आहे, याची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली आहे. त्यानुसार  25 सप्टेंबर रोजी 34,34,388 भगिनींना 1545.47 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. आणि 26 सप्टेंबर रोजी 38,98,705 भगिनींना 584.8 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT